कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा युवकांना बसतोय फटका; ICMR नं सांगितलं कारण

दैनिक गोमंतक
बुधवार, 12 मे 2021

प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा युवकांना मोठ्याप्रमाणात संसर्ग होत असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) याचं कारण सांगितलं आहे. देशातील तरुणांनी मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी त्यामुळेच कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं आयसीएमारने निरिक्षण नोंदवलं आहे. (The second wave of corona strikes the youth The reason given by ICMR)

युवकांना कोरोनाची लागण होण्याचं कारण काय असं विचारण्यात आलं असता, आयसीएमारचे महासंचालक बलराम भार्गव(Balram Bhargava) यांनी सांगितलं की, ''पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेतील डेटा तपासून पाहिला असता त्यामध्ये जास्त काही फरक जाणवत नसल्याचं दिसून येत आहे. प्रतिकूल परिणामासाठी 40 वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक जास्त असुरक्षित असतात.'' 

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांच्या सेवेत आता 'तरंगणारी अम्ब्युलन्स'

''तरुणांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण थोडं वाढल्याचं दिसत आहे कारण तरुणांनी अचानक घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला असून त्याचाही परिणाम झालेला असू शकतो,'' असं बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला आहे. दरम्यान देशातील 16 राज्यांमध्ये ज्यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ यांचा समावेश आहे तिथे रुग्णसंख्या वाढत असतानाही देशात मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसत असल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

गंगेत फेकले जातायेत कोव्हिड मृतदेह?

केंद्र सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र राजस्थान, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश आणि तेलंगणा हे त्या 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी आहेत जिथे दररोज कोरोना रु्ग्णांच्या संख्येत वाढ  होत आहे किंवा घट होत आहे. दरम्यान 16 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) सांगितलं आहे.

संबंधित बातम्या