श्रीनगरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 31 डिसेंबर 2020

श्रीनगरमधील लावेपोरा येथे मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या चकमकीचा शेवट तीन दहशतवाद्यांचा खातमा करीत झाला.

श्रीनगर :  श्रीनगरमधील लावेपोरा येथे मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या चकमकीचा शेवट तीन दहशतवाद्यांचा खातमा करीत झाला. चकमक थांबली असली तरी शोध मोहीम सुरू असून ज्या घरात दहशतवादी लपले होते, त्याच्या काही भागाचे नुकसान झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी काल दिली. लावेपोरा येथे दहशतवादी लपले असल्याची माहिती काल मिळाल्यानंतर लष्कराच्या २ राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय सुरक्षा पोलिस दलाच्या जवानांनी त्या भागाला वेढा दिला. ते पाहून दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यानंतर तेथे चकमक सुरू झाली होती. 

ज्या भागात वेढा दिला होता, त्या संपूर्ण भागातील सुरक्षा व्यवस्था वाढविली होती. दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून येण्या-जाण्याचे सर्व मार्ग बंद केले होते. जवानांची जादा कुमक तैनात केली होती. या भागात अन्य कोणताही हानी होऊ नये, याची खबरदारी घेत दिवे लावले होते आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण शांतता बाळगली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीने श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. बारामुल्ला, सोपोर, गुलमर्गहून श्रीनगरला जाणाऱ्या वाहनांना मागाम-बडगाम मार्गे प्रवेश दिला जात 
होता.

संबंधित बातम्या