CYCLONE YAAS: यास वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर

cyclone location.jpg
cyclone location.jpg

बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) पूर्व मध्य भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे "तीव्र चक्रीवादळ वादळ" येणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मेटरॉलिजिकल लॉजीकल विभागाने  (India Meteorological Department) काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्यानुसार 'यास' नामक वादळ आता पुढच्या 24 तासांत किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. किनारी भागांमध्ये या वादळाचे परिणाम दिसायला  सुरुवात  अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असल्याची माहिती मिळते आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिसा राज्यांना या वादळाचा मोठा फटका बसणार असून, या वादळाचे परिणाम हे अम्फान वादळापेक्षा मोठे असू शकतात. त्या अनुशंघाने सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  (See the live location of the CYCLONE YAAS on your mobile) 

Yellow Fungus: काळ्या आणि पांढऱ्या बुरशी नंतर आता आली "पिवळी बुरशी"
यास या वादळाचा पूर्वेकडील किनारपट्टीवर असलेल्या राज्यांना फटका बसण्याची शक्यता असून पश्चिम बंगालच्या तसेच ओडिसाच्या काही भागांवर देखील  परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याकाळात जोरदार वारा आणि पाऊस होणार असल्याची  हवामान  आहे. मात्र तरीदेखील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्ही या वादळाचे लाईव्ह लोकेशन तुमच्या फोनद्वारे सुद्धा पाहू शकता. खाली दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन तुम्ही तुमच्या फोनमध्ये पाहू शकता. 

यास चक्रीवादळाची सद्यस्थिती माहित करून घेण्यासाठी, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात विश्वासार्ह संकेतस्थळांपैकी mausam.imd.gov.in ही एक वेबसाइट आहे. ही वेबसाइट भूविज्ञान मंत्रालयाने(पृथ्वी विज्ञान मंत्रालय) विकसित केली आहे. या माध्यमातून आपण तौकतेसह वेगवेगळ्या वादळांचे लाईव्ह लोकेशन पाहू शकता. सध्याच्या तौकते वादळाचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी गूगल सर्चवर mausam.imd.gov.in टाइप करा आणि खालील वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला वादळाचे लाईव्ह लोकेशन दिसेल. 

ही सुद्धा एक विश्वासार्ह वेबसाइट आहे ज्यामाध्यमातून चक्रीवादळांचा रीअलटाइम ट्रॅक करू शकतो. www.cyclocane.com वेबसाइटवर जा आणि अधिक तपशील मिळवण्यासाठी साइटवर उपलब्ध असलेल्या लिंक वर क्लिक करा.

चक्रीवादळाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यासाठी आपण या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.  या वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावरच तुम्हाला वादळाबद्दलची माहिती मिळेल. तसेच वादळाचे लाईव्ह लोकेशन सुद्धा पाहता येईल. तसेच अधिक माहितीसाठी आपण वेबसाइटवर दिलेल्या चक्रीवादळावरील चिन्हावर क्लिक करू शकता. या वेबसाईटच्या माध्यमातून उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, चक्रीवादळ आणि चक्रीवादळ बुलेटिन आणि जागतिक स्तरावर उपग्रह आणि रडार प्रतिमा आपण पाहू शकता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com