हल्याळ येथे बियाणे वितरीत

Dainik Gomantak
सोमवार, 18 मे 2020

बियाणे वाटपाचा कार्यक्रम ताेटगारीके खात्याच्या सहयाेगाेने तहसीलदार कार्यालयात आयाेजित करण्यात आला

हल्याळ

हल्याळ येथे काेविड -19 विषाणू संसर्गामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला म्हणुन येणा-या काळात  भाजीपाला बियाण्यांची कमतरता हाेऊ नये म्हणुन हल्याळ जाेयडा मतदार संघाचे आमदार आर.व्ही.देशपाडे  बियाण्यांचे वाटप केले. त्यांनी अमेरीकन-इडाे कंपनीकडे विनंती केली आणि त्यांची मागणी मान्य करून अमेरीकन-इडाे कंपनीचे मालक  संताेष अतार यांनी हल्याळ व जाेयडा येथील शेतकरी वर्गाला भाजीपाला व धान्याची उत्तम बियाणी उपलब्ध केली. बियाणे वाटपाचा कार्यक्रम ताेटगारीके खात्याच्या सहयाेगाेने तहसीलदार कार्यालयात आयाेजित करण्यात आला आणि शेतकरी वर्गाला भाजीपाला बियाण्यांचे माेफत वितरण करण्यात आले यावेळी व्यासपिठावर कारवार जिल्हा विधान परिषद सदस्य एस.एल.घाेटणेकर व कारवार जिल्हा पंचायत उपाध्यक्ष संताेष रेणके, व इतर जिल्हा पंचायत सदस्य आणि अमेरीकन-इडाे कंपनीचे अधिकारी अनिल कारद उपस्थित हाेते.

 

 

संबंधित बातम्या