पैसा पाहून चोराला आला ह्रयविकाराचा झटका

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

चोरी केलेल्या काही रकमेचा भाग त्याने स्वत:वरील उपचारावर खर्च केला.

बिजनौर: उत्तरप्रदेशातून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका चोराला चोरीदरम्यान अनपेक्षितरीत्या मोठी रक्कम हाती लागल्यानंतर त्याला इतका आनंद झाला की, त्याला ह्रयविकाराचा झटका आला. त्यामुळेच चोरी केलेल्या काही रकमेचा भाग त्याने स्वत:वरील उपचारावर खर्च केला. उत्तरप्रदेशमधील बिजनौर येथील कोठीवाडा ग्रामीण सार्वजनिक केंद्रामध्ये झालेल्या चोरीसंदर्भात बुधवारी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. या चोरीदरम्यान दोन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांपैकी एका चोराने हाती लागलेल्या रकमेचा काही भाग स्वत:वरील उपचारावर खर्च केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान सांगितले आहे.

बिजनौर पोलिस अधिक्षक धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब हैदर यांच्या मालकिच्या सार्वजनिक केंद्रावर दोन चोरांनी डल्ला मारला आहे. 16 ते 17 फेब्रुवारीच्या रात्री चोरांनी हा कारनामा केला. त्यानंतर नवाब हैदर यांनी या प्रकरणात पोलिस तक्रार दाखल करत आपल्या सार्वजनिक केंद्रामधून सात लाख रुपयाची रोकड चोरीला गेल्याचं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. बिजनौर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पोलिसांनी या प्रकराणाचा छडा लावत दोन व्यक्तींना अटक करण्य़ात आलं असल्याचं सांगितलं. नौशाद आणि अजीज अशी या दोघांची नावे आहेत. ही दोघेही अलिपूर आणि नगिना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवाशी आहेत. पोलिसांनी या दोन चोरांनी पकडण्यासाठी एका रेस्टारंटमधून या दोन्ही आरोपींवर पाळत ठेवून अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Seeing the money the thief suffered a heart attack)

पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांच्या वाहनांवर हल्ला; महिला पत्रकार जखमी 

पकडण्यात आलेले आरोपी सराईत चोर आहेत. त्यांच्याविरोधात इतर अनेक पोलिस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी नवाब हैदर यांच्या सार्वजनिक सोवा केंद्रामध्ये सात लाख रुपायांची चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. या सार्वजनिक केंद्रामधून काही हजार रुपये आपल्या हाती लागेल असा अंदाज लावला असल्याची माहिती आरोपींनी दिली. मात्र या सार्वजिक केंद्रामधून आपेक्षीत रकमेपेक्षा जास्त रक्कम हाती लागली. त्यानंतर ही रक्कम दोघांनी आपआपसात वाटून घेतली. मात्र त्यांनतर अजीजला लगेचच ह्रयविकाराचा झटका आला आणि त्याला उपचारासाठी एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. मिळालेला निम्मा पैसा अजीजने त्याच्या उपचारावर खर्च केला. तर दुसरीकडे नौशादने त्याला मिळालेली रक्कम दिल्लीत सट्ट्यामध्ये उडवली, असं सिंह यांनी सांगितलं.

या दोन सराईत चोरांकडून 3.7 हजार रुपये रक्कम, दोन पिस्तूल, आणि एक चोरी करण्यात आलेली बाईक अशा गोष्टी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय पोलिस दलाने घेतला असल्याचे सिहं यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या