“आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियान” सुरु

pib
शनिवार, 27 जून 2020

अमित शहा म्हणाले, “गरीब आणि ग्रामीण विकासाचा मिलाप असणाऱ्या या अभूतपूर्व योजनेबद्दल मी पंतप्रधान, नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो.”

नवी दिल्ली, 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरु केलेले “आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियान” उत्तरप्रदेशाच्या विकासाला गती प्रदान करेल. “गरीब कल्याण रोजगार अभियानाशी जोडलेली ही योजना उत्तरप्रदेशच्या विकासाचा वेग दुप्पट करेल” असे अमित शहा यांनी आपल्या ट्वीटर संदेशांच्या मालिकेत सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियान” अंतर्गत पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान रस्ते योजना, शौचालये आणि द्रुतगती मार्गाचे बांधकाम, वृक्षारोपण इत्यादी विकासकामे हाती घेतली जातील”. “यामुळे केवळ गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होणार नाही तर ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासातही हे अभियान महत्वाची भूमिका बजावेल,” असे ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, “उत्तरप्रदेशातील 31 जिल्ह्यांमध्ये आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियान राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील कोट्यावधी स्थलांतरित मजूर आणि गरीब कामगारांना या अभियानांतर्गत त्यांच्या घराजवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील”. 

 

संबंधित बातम्या