बंडखोर आमदारांना बंगालमध्ये पाठवा, त्यांची चांगली खातरजमा करू- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
Mamata Banerjee Dainik Gomantak

बंडखोर आमदारांना बंगालमध्ये पाठवा, त्यांची चांगली खातरजमा करू- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

आपल्या कुशाग्र वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उडवली भाजपची खिल्ली

आपल्या कुशाग्र वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी महाराष्ट्रातील राजकीय संकटावर भाजपची खिल्ली उडवली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजपला सुनावण्यात कोणतीही कसर सोडली नाही. 'महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही त्यांची चांगली काळजी घेऊ,' असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे. (Maharashtra Political Crisis)

राष्ट्रपती निवडणुकीची वेळ विचारपूर्वक निवडण्यात आली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण करण्यासाठी भाजपने ही वेळ निवडल्याचा आरोप केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते एक लाख मतांच्या मागे आहेत, त्यामुळे त्यांनी ही वेळ निवडल्याचे बॅनर्जींचे म्हणणे आहे. भाजपकडे पैशांची कमतरता नाही आणि ते घोडे-बाजार करू शकतात. ही परिस्थिती पाहून प्रजासत्ताकाबाबत साशंकता निर्माण होत आहे. आम्हाला स्वतःसाठी आणि या देशाला न्याय हवा आहे. आम्हाला उद्धव ठाकरे आणि सर्वांना न्याय हवा आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

Mamata Banerjee
1980मध्ये महाराष्ट्राला 112 दिवस मुख्यमंत्री नव्हता, शरद पवारांनी केला होता 'खेला'
Mamata Banerjee
महाराष्ट्र विधानसभेतील बहुमताचे गणित घ्या समजून, हे तीन पर्याय उपलब्ध

सीएम ममता यांनी भाजपवर निशाणा साधला आणि प्रजासत्ताक बुलडोझ केली जात असल्याचे म्हटले. 'आसाम पुराच्या धोक्याशी झुंज देत आहे आणि या आपत्तीच्या काळात महाराष्ट्रातील आमदारांना तिकडे का पाठवले जात आहे? आज तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही पैसा, सत्ता माफियाचा चांगला वापरत आहात, पण एक दिवस असा येईल की तुम्हाला जावेच लागेल. हे चुकीचे असून आम्ही त्याचे समर्थन कधीच करणार नाही,' असे म्हणत भाजपला चांगलेच सुनावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com