Serum Institute सप्टेंबरपासून स्पुटनिक-V तयार करणार !

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या (Drugs Controller General of India) मान्यतेनंतर प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.
CEO of Serum Institute of India Adar Poonawalla
CEO of Serum Institute of India Adar PoonawallaDainik Gomantak

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) सप्टेंबरपासून रशियाच्या स्पुटनिक-V (Sputnik-V) लस तयार करणार असुन, दरवर्षी 300 दशलक्ष डोस तयार करणार आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी RDIF (Russian Direct Investment Fund) आणि सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया सप्टेंबरपासून स्पुटनिक-V लसीचे उत्पादन सुरू करणार आहे. लस तयार करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या मान्यतेनंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही कंपन्यामिळून वर्षभरात देशात 30 कोटी स्पुतनिक लसींचे उत्पादन करणार आहेत. (Serum Institute will be producing the Sputnik-V vaccine from September)

सप्टेंबर 2021 मध्ये लसीची पहिली खेप तयार होण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे प्रमुख, आदर पुनावाला म्हणाले की, “स्पुटनिक-V लस निर्मितीसाठी RDIAF सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही येत्या काही महिन्यांत लाखो डोसचे उत्पादन करु, ट्रायल बॅचेस सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतील.”

यावेळी बोलताना,'स्पुतनिक लस उच्च कार्यक्षमता आणि चांगल्या सिक्युरीटी प्रोफाइलच्या बाबतीत भारत आणि जगभरातील लोकांना उपलब्ध होणे महत्वाचे आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय संस्था आणि वेगवेगळ्या देशांना कोरोना साथीच्या विरूद्ध युद्धात सहकार्य करणे महत्वाचे असल्याचे आदर पुनावाला यांनी सांगितले.

CEO of Serum Institute of India Adar Poonawalla
यंदा वेळेपेक्षा पाच दिवस उशीरा मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रिव (Kirill Dmitriev) म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूटशी भागीदारी करण्यास RDIAFला सुद्धा आनंद झाला. उत्पादन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही भागीदारी एक महत्त्वाची पायरी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com