सिरम इन्स्टिट्यूटकडून जून महिन्यात 10 कोटी कोविशील्डचे डोस मिळतील; केंद्राला पत्र 

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

लसीसंदर्भात अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येत आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid19) वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसींचा (Corona vaccine) तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाची मोहीम (Vaccination campaign) मंदावली आहे. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर (Modi government) निशाणा साधला आहे. यासाठी लसीसंदर्भात अतिरिक्त माहिती केंद्र सरकारकडून राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येत आहे. येत्या जून महिन्यात 12 कोटी कोरोना लस उपलब्ध असेल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. तर सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) केंद्र सरकारला  जूनपर्यंत 10 कोटी लस देणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतचं पत्र देखील सिरमने गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांना दिलं आहे. 

आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, ''जून महिन्यात आम्ही 10 कोटी कोविशील्ड लसीची निर्मिती करत पुरवठा करणार आहोत. मे महिन्यामध्ये 6.5 कोटी लसींची निर्मिती केली होती. आणि पुरवठा देखील केला होता. देशातील लसींची मागणी पाहता आम्ही उत्पादन वाढवलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट देशातील जनतेप्रती कटीबध्द आहे. आमची संपूर्ण टीम केंद्र सरकारच्या बरोबरीने काम करत आहे. तसेच कोरोना विरुध्दच्या लढाईत आम्ही मैदानात उतरलो आहोत,'' असं कंपनीचे नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह (Prakash Kumar Singh) यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह

''आम्हाला केंद्र सरकारकडून विधायक कामं करण्यासाठी पाठिंबा मिळत आहे. येत्या काळात आम्ही कोरोना लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत,'' असंही त्यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

पुण्यात कोविशील्ड(Covishield) लस बनवण्याचे काम रात्रदिंवस सुरु असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. देशातील लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. असंही त्यांनी सांगितलं आहे. याआगोदर सीरमने जून महिन्यामध्ये 6.5 कोटी लसींची निर्मिती केली असल्याचं सांगितलं होतं. तसेच जुलै महिन्यात 7 कोटी, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात10 कोटी कोरोना लसींची निर्मिती केली जाईल अस सांगितलं होतं. 

संबंधित बातम्या