कुरुनगुडी येथे फटाक्यांच्या स्फोटात सात महिला ठार; ४ जण गंभीर जखमी

पीटीआय
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

चेन्नईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर कट्टूमन्नारकोली परिसरातील कुरुनगुडी गावातील फटाके कारखान्यात अचानक  स्फोट झाला. कारखान्याकडे फटाके निर्मितीचा परवाना होता. तसेच या ठिकाणी  स्थानिक महिला आणि पुरुष  काम करत होते.

चेन्नई: फटाका कारखान्यात स्फोट होऊन सात जण मृत्युमुखी, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज कुरुनगुडी गावात घडली. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या सर्व महिला कामगार आहेत. स्फोटाची तीव्रता एवढी होती, की आवाज बराच अंतरावर आवाज ऐकू गेला.

चेन्नईपासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर कट्टूमन्नारकोली परिसरातील कुरुनगुडी गावातील फटाके कारखान्यात अचानक  स्फोट झाला. कारखान्याकडे फटाके निर्मितीचा परवाना होता. तसेच या ठिकाणी  स्थानिक महिला आणि पुरुष  काम करत होते. या कारखान्यात गावठी बॉम्ब तयार करत होते की परवानाप्राप्त स्फोटकांचा वापर करत होते, याचा तपास सुरू असल्याचे कुड्डालोरचे पोलीस अधीक्षक अभिनव यांनी सांगितले. स्फोटामुळे इमारतीचा बराच भाग ढासळला आणि त्याखाली कामगार दबले गेले. घटनेची माहिती कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 

दिवाळीचा हंगाम गेला
सध्या कोरोना संसर्गाचे अनलॉक-४ सुरू असताना कारखान्यात शंभर टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे बहुतांश कारखाने पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. तसेच, लॉकडाउनमुळे दिवाळीचा हंगाम गेला असला तरी उर्वरित काळात फटाके तयार करण्याचे काम सुरू आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या