हि ठरणार स्वतंत्र भारतात फाशी मिळणारी पहिली महिला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. भारताचा इतिहास आहे की आजपर्यंत कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही.

उत्तर प्रदेश: स्वातंत्र्यानंतर भारतात पहिल्यांदाच एका महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. भारताचा इतिहास आहे की आजपर्यंत कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. या महिला गुन्हेगाराचे शबनम असे नाव आहे. प्रियकराच्या मदतीने शबनमने कुटुंबातील सात जणांची एका वेळी हत्या केली होती. उत्तरप्रदेशमधल्या मथुरा येथिल तुरूंगात तिला फाशी देण्यात येणार आहे. शिक्षेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

शबनमने सुप्रीम कोर्टात अमरोहा कोर्टाने दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने आपल्या मिर्णयात बदल केला नाही. त्यानंतर राष्ट्रपतींकडे देखील शबनम आणि सलीमने दयेची याचिका दाखल केली होती. राष्ट्रपतींनी देखील ही दया याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकारानंतर देशात पहिल्यांदाच एखाद्या महिला गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होणार आहे.

उत्तर प्रदेशमधील अमरोहा गावात 7 जणांच्या हत्येप्रकरणी शबनमला मथुरा कारागृहात फाशी देण्यात येणार आहे. यादरम्यान, शबनमच्या मुलाने पुन्हा एकदा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे दयेची याचीका दाखल केली आहे. 2008 च्या या भयानक मर्डर प्रकरणात शबनमने तिचा प्रियकर सलीमसोबत मिळून कुऱ्हाडीने तिच्या कुटुंबातील सदस्यांचा गळा कापला होता. हत्येच्या प्रकरणानंतर लगेच तुरुंगात पाठविण्यात आलेल्या शबनमने डिसेंबर 2008 मध्ये ताज नावाच्या मुलाला तुरूंगातच जन्म दिला होता.

मिळातेल्या माहितीनुसार फाशीची शिक्षा होणारी शबनम ही स्वतंत्र भारतातील पहिली महिला असणार आहे. याबद्दल बर्‍याच चर्चा रंगत आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यापैकीच शबनमच्या 12 वर्षाच्या मुलाचे काय होईल? त्याचे संगोपन आणि शिक्षण केसे होईल? लहानपणापासून 12 वर्षांपर्यंत आई शबनमबरोबर तुरूंगात असलेला मुलाचे भविष्य काय असणार? असे अनेक प्रश्न पुढे येत आहे.

आरोपी शबनम बावनखेडी या गावची आहे. 2008 साली झालेल्या भयानक हत्येनंतर आम्ही हादरून गेलो होतो. गावातील अनेक मुलींचे नाव त्यावेळी शबनम होते. त्यापैकी अनेक मुलींचे लग्न झाले आहे. 2008 साली झालेल्या या घटनेनंतर गावातील एकाही व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव शबनम ठेवले नाही. शबनमला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी गावकऱ्यांची भावना आहे," असे मत बावनखेडी गावचे सरपंच मोहम्मद नबी यांनी व्यक्त केले.

आश्चर्यच!  जीव वाचविण्यासाठी चक्क ट्रेनखालीच झोपली महिला -

संबंधित बातम्या