Shafiqur Rahman Barq: सपा खासदाराने पीएम मोदींवर केले वादग्रस्त वक्तव्य

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Shafiqur Rahman Barq: सपा खासदाराने  पीएम मोदींवर केले वादग्रस्त वक्तव्य
Shafiqur Rahman BarqDainik Gomantak

Shafiqur Rahman Barq on PM Modi: भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणावरुन देशात जोरदार राजकारण सुरु आहे. (shafiqur rahman barq burning statement on prophet row nupur sharma narendra modi amit shah jumma prayer)

दरम्यान, शुक्रवारच्या नमाजाच्या एक दिवस आधी समाजवादी पक्षाचे (Sp) खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी वादग्रस्त वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची खिल्ली उडवली.

Shafiqur Rahman Barq
प्रेषित मोहम्मद आक्षेपार्ह वक्तव्य : नुपूर शर्मा यांच्या अडचणी वाढल्या

देशातील आणि जगातील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि...

सपा खासदार शफीकुर रहमान बुर्के म्हणाले की, ''मुहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशातील आणि जगातील परिस्थिती बिघडत आहे. मात्र पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह मौन बाळगून आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ हिंदूंचे नाही तर मुस्लिमांचेही आहेत.''

Shafiqur Rahman Barq
नुपूर शर्मा वादग्रस्त वक्तव्य: देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना

देशाची आणि जगाची परिस्थिती आणखी बिघडायला नको का?

सपा खासदार शफीकुर रहमान बुर्के म्हणाले की, ''पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करुन परिस्थिती हाताळली पाहिजे, कारण देशातील परिस्थिती आणखी बिघडू नये अशी आमची इच्छा आहे. त्याचबरोबर भविष्यात मुहम्मद पैगंबरांवर कोणीही वादग्रस्त वक्तव्य करु नये यासाठी सरकारने कठोर कायदा करावा.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com