शक्तीमानचे रिहाना,मिया,ग्रेटावर टिकास्त्र

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

 दिल्लीत  कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आंदोलन करत आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीत नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काही लोक पाठिंबा तर काही लोकांनाी विरोध दर्शवला. काही चित्रपट अभिनेते शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहेत, तर काही  केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत आहेत. यामध्ये परदेशी सेलिब्रिटींनी सुध्दा ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. 

प्रसिध्द अभिनेते  मुकेश खन्ना यांचा व्हिडिओ चांगलाच व्हयरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुकेश खन्ना म्हणत आहेत की,''ते बाहेरील लोक आपल्या देशाच्या प्रश्नांबद्दल बोलत आहेत, त्यांना आपल्या देशाच्या परिस्थितीबद्दल काहीही कल्पना नाही. शेतकरी आंदोलनाचे रूप बदलत आहे, आणि परदेशी स्टार मिर्च मसाला लावुन वातावरण चिघळवत आहेत. पॉप स्टार रिहाना, पोर्न स्टार मिया खलिफा आणि पर्यावरणीय  कार्यकर्ते  ग्रेटा थनबर्ग  यांनी  शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे.

Chakka Jam: शेतकऱ्यांसह दिल्ली पोलिसही चक्का जामसाठी सज्ज

या व्हिडिओत मुकेशचा खन्ना पुढे म्हणतात की, ''पहिली गोष्ट म्हणजे हे सर्व बाहेरील लोक आहेत ज्यांचा आमच्या अंतर्गत प्रश्नासंबंधी काहीही त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. हे लोक एकाच गाण्यासाठी 50 कोटी घेतात, ते शेतकऱ्यांचे  नाही  तर  पैशाचे  भक्त आहेत. त्यांना एका ट्विटसाठी कोट्यवधी रुपये मिळाले असतील,'' असा आरोप  मुकेश  खन्ना  यांनी  बाहेरील  सेलीब्रेटींवर  केला  आहे.

शेतकरी आंदोलनावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. भारतीय सेलिब्रेटी विरुध्द विदेशी सेलिब्रेटी असे गट पाहायला मिळत आहेत. कृषी कायद्यासंबधी शेतकऱ्यांनी आपळी भूमिका स्पष्ट केली आहे. ''जो पर्यंत केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे.''

संबंधित बातम्या