Lakhimpur Kheri Violence: सरकारने लोकशाहीचा खून केलाय, शरद पवारांचा घणाघात
Sharad PawarDainik Gomantak

Lakhimpur Kheri Violence: सरकारने लोकशाहीचा खून केलाय, शरद पवारांचा घणाघात

दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी मागील काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.

दिल्लीच्या सीमेवर कृषी आंदोलनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी मागील दीड वर्षापासून आंदोलन करत आहेत. मात्र लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला तो निषेधार्य होता असं म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी योगी आणि मोदी सरकारवर घणाघात केला.


Sharad Pawar
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी पोलीसांच्या ताब्यात,उत्तर प्रदेशात राजकारण तापलं

पवार पुढे म्हणाले, ''केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांवर हल्ला करत आहे. यातच लखीमपूर खेरीतील हल्ल्यात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून याची जबाबदारी मोदी सरकार आणि योगी सरकारची आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांवर हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. त्याचबरोबर या हल्ल्य़ाची तात्काळ चौकशी सुरु करण्यात यावी. त्याचबरोबर या घटनेच्या निषेधार्थ देशातील शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे. दुसरीकडे मात्र विरोधकांना लखीमपूरमध्ये जाण्यापासून योगी सरकारकडून रोखण्यात येत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यामान न्यामूर्तींच्या अध्यक्षतेखाली या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. देशातील शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी जी काही पाऊले उचलण्याची गरज आहे त्यासाठी मी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हटले. योगी सरकारकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये ज्या प्रकारे देशातील नागरिकांची हत्या ब्रिटीशांनी केली होती त्याप्रमाणे योगी सरकार करत आहे.''

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com