राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्याला निघून गेले म्हणत पवारांनी केली नाराजी व्यक्त

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्याला निघून गेले म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई: आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी गोव्याला निघून गेले म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सभेला संबोधित करतांना राज्यापाल भगतसिंह कोश्यारी याच्यावर जोरदार टिका केली आहे.

मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. “तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” असा  जोरादार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर लगावला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबोधित करत आहे.

 

सोबतच “राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं.” असे वक्तव्यही शरद पवार यांनी केले आहे.

पक्ष सोडून जाणाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी दिला इशारा

मागील 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. या सभेला महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. दिल्लीत निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत होत असलेल्या शेतकरी सभेला आज संबोधित करतांना बोलत होते. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तेव्हा राज्यपालांची भेट घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी दिला होता.

 

दरम्यान भारताच्या स्वांतत्र्य लढयात पंजाबच्या शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे चीन-पाकिस्तानविरोधात त्यांनी युद्ध लढले आहे, असे शरद पवार म्हणाले. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांशी काहीह घेणंदेणं नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. आणि सरकारला शेतकऱ्यांची पर्वा नाही असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी थंडी, वाऱ्याच्या वातावरणात कशाचीही पर्वा न करता गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र  देशाच्या पंतप्रधानांनी त्यांची कधी चौकशी केली का? हे शेतकरी पाकिस्तानचे आहेत का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला होता.

संबंधित बातम्या