शरद पवारांनी मोदी सरकरला धरले धारेवर...

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांशी काहीह घेणंदेणं नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली: ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांशी काहीह घेणंदेणं नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्याच सभेला पवार संबोधित करत आहे.

प्रजासत्ताकदिनी राजपथावर जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’ -

मागील 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. या सभेला महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. दिल्लीत निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईत  होत असलेल्या शेतकरी सभेला आज संबोधित करतांना बोलत होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी थंडी, वाऱ्याच्या वातावरणात कशाचीही पर्वा न करता गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र  देशाच्या पंतप्रधानांनी त्यांची कधी चौकशी केली का? हे शेतकरी पाकिस्तानचे आहेत का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांची  चौकशी केली आहे का? पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का? असे प्रश्न करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भारताच्या स्वांतत्र्य लढयात पंजाबच्या शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे चीन-पाकिस्तानविरोधात त्यांनी युद्ध लढले आहे, असे शरद पवार म्हणाले. कोणताही कायदा करत असतांनासविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे, पण आम्हाला या कायद्याबाबत बोलू दिले नाही असे सांगत कायदा मंजूर करण्याच्या प्रक्रियेवर पवारांनी टीका केली आहे.

 

 

 

संबंधित बातम्या