लसिकरणाचे फोटो शेअर करा आणि सरकारकडून पाच हजार रूपयांचे बक्षिस मिळवा

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 मे 2021

लोकांना लसीकरणासाठी प्रेरीत करण्यासाठी  केंद्र सरकार लसीकरणीचा फोटो चांगल्या टॅगलाइनसह शेअर करणाऱ्याला 5,000० हजार रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे.
 

नवी दिल्ली:  देशात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने(Modi Government) लसीकरण मोहीम(Vaccination) अधिक तीव्र केली आहे. सद्यस्थितीत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. अशा परिस्थितीत सरकार आता तुम्हाला घरी बसून 5000हजार रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. जो व्यक्ती एका चांगल्या टॅगलाइनसह आपला लसीचा फोटो शेअर करेल त्याला सरकारकडून 5000 रुपये रोख बक्षीस(reward) मिळणार आहे. आता आपण घरी बसून 5 हजार रुपये कसे कमवू हे बघूया.(Share photos of vaccination and get a reward of five thousand rupees from the government)

My Gov India ने केले ट्विट
My Gov India या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, "जर तुम्ही नुकतीच लस घेतली असेल तर तुम्हीही लक्षावधी लोकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करू शकता. आपला लसीकरणाचा फोटो एका मनोरंजक आणि उत्तम टॅगलाइनसह शेअर करा आणि  5,000 रूपये जिंकण्याची संधी मिळवा!" असे My Gov India च्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Monsoon: मान्सून 27 मे ला केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

इथे शेअर करा आपले फोटो
My Gov India ने ट्विटरवर फोटो शेअर करण्यासाठी लिंक दिली आहे. ज्यावर क्लिक करून आपण आपले फोटो शेअर करू शकता. फोटो शेअर करण्यासाठी या  https://bit.ly/3sFLakx  लिंक वर क्लिक करा.

यांना मिळणार बक्षिस
निवडलेल्या 10 टॅगलाइनला सरकारकडून 5000 रुपये दिले जातील. आणि हि बक्षिसे प्रत्येक महिन्याला मिळणार. आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला लस दिली गेली असल्यास, लसीकरणाचे महत्त्व यावर चांगले टॅगलाइन देवून लसीकरण केल्याचे फोटो शेअर करा. आणि लोकांना लसिकरणासाठी प्रेरित करा. या प्रकारे, आपण या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करू शकता.

1100 वर्षांपूर्वींच्या मंदीरातील रुग्णालयाची कहाणी; इथं सर्जरीही केली जायची 

अशा प्रकारे करू शकता रजिस्ट्रेशन
आपल्याला सर्वात आधी My Gov पोर्टलवर जाणे आवश्यक आहे. येथे आपल्याला लॉग इन टू पार्टिसिडेट टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर नोंदणीचा ​​तपशील भरावा लागेल.

संबंधित बातम्या