जीडीपी घसरला आणि दाढी वाढली! पंतप्रधानांची शशी थरूरांनी उडवली खिल्ली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविंद्रनाथ टागोर यांच्याप्रमाणे स्वत:ची प्रतिमा बनवू पाहत आहे अशी जोरदार टीकाही त्यांच्यावर हल्ली केली जात आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दिसण्याबाबत आणि प्रतिमेबाबत सातत्याने काळजी घेणाऱ्या कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये आपली दाढी वाढवली आहे.  दाढी वाढवण्यावरुन त्यांच्यावर अनेकदा टीका, विनोद केले जाते आणि त्याच्या या लूक ची खिल्ली देखील उडवली जाते. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविंद्रनाथ टागोर यांच्याप्रमाणे स्वत:ची प्रतिमा बनवू पाहत आहे अशी जोरदार टीकाही त्यांच्यावर हल्ली केली जात आहे. मात्र, अशातच आता काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी मोदींच्या दाढीवरुन एक खोचक अशी टीका केली आहे. थेट देशाच्या जीडीपीशी त्यांनी मोदींच्या दाढीचा संबंध लावला आहे. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीशी 2017 ते 2019-20 या कालावधीत भारताच्या जीडीपीच्या आकडेवारीची तुलना केली. त्यांनी एक खोचक ट्विट करून पंतप्रधान मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच फोटो असून त्यात त्यांची दाढी वेगवेगळ्या आकारात दिसत आहे. हे ट्विट या ग्राफिक्ससह केले गेले आहे. ग्राफिक्समध्ये असे दिसून आले आहे की 2017-18च्या चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 8.1टक्के होता, जो 2019-20 च्या दुसर्‍या तिमाहीत  4.5 वर घसरला आहे. “याला ग्राफिक्स इलस्ट्रेशनचा म्हणतात,” असे कॅप्शन दिले आहे.

सोशल मिडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं वकिलाला पडलं महाग; जाणून घ्या कारण 

चालू आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 1.3 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल असे समजावून सांगा. पहिल्या दोन तिमाहीत कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावामुळे मोठी घसरण नोंदवली गेली. असे एका अहवालात म्हटले आहे. सरकार चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबरच्या तिमाहीतील जीडीपी डेटा शुक्रवारी जाहीर करणार आहे. डीबीएस बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की 2020-21 आर्थिक वर्षात जीडीपी 6.8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बँकेच्या अहवालानुसार 2020 सालच्या शेवटच्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) जीडीपी दर सकारात्मक श्रेणीत येण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस 

विरोधकांकडून सातत्याने नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीचे विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याची टीका अजूनही केली जाते. त्याचबरोबर जीएसटीची अंमलबजावणी देखील अर्थव्यवस्थेला हानीकारक ठरल्याचे टीकाकार म्हणतात. भारतीय अर्थव्यवस्थेचे कोरोनापूर्वीच कोडमडली होती. कोरोनानंतर तर आणखीनच कंबरडं मोडल्याची अवस्था सध्याची आकडेवारी दाखवतात. याच पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेच्या गेल्या सहा तिमाहीमध्ये देशाच्या जीडीपीमध्ये जोरदार घसरण झाल्याचे चित्र आहे. हेच चित्र शशी थरुर यांनी एका ग्राफीकद्वारे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या केला आहे. आणि त्यांनी ट्विट करून आपले मत व्यक्त केले आहे. या ग्राफीकमध्ये दोन भाग केले आहे वरच्या भागात जीडीपीचा घसरलेला आलेख आहे. तर खालच्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या दाढीचा आलेख दाखविला गेला आहे.  This is what is meant by a "graphic illustration"! असं या ट्विटला कॅप्शन देत शशी थरुर यांनी तो फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रकारच्या समर्थन आणि विरोधी प्रतिक्रिया देखील देणयात आल्या आहेत.

संबंधित बातम्या