एआयएडीएमकेच्या नेत्या शशिकला यांचा राजकीय आणि सार्वजनिक जीवनाला गुडबाय

दैनिक गोमन्तक
बुधवार, 3 मार्च 2021

तमिळनाडूच्या राजकारणातल्या ज्येष्ठ नेत्या व्ही. के. शशिकला यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे.

तमिळनाडूच्या राजकारणातल्या ज्येष्ठ नेत्या व्ही. के. शशिकला यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच व्ही. के. शशिकला यांनी आपला निर्णय जाहीर केल्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपल्या एका निवेदनात व्ही. के. शशिकला यांनी सार्वजनिक जीवन सोडत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शशिकला यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सांगितले आहे. आणि सत्ता हे आपले कधीच लक्ष्य नव्हते असे त्यांनी पुढे म्हटले आहे. 

भारत बायोटेकने बनवलेली 'कोव्हॅक्सीन' 81 टक्के प्रभावशाली

व्ही.के. शशिकला यांनी राजकारणातून आणि सार्वजनिक जीवनातून निवृत्त होण्याची घोषणा करण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने व्ही. के. शशिकला यांच्याबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएडीएमके पक्षाला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे म्हटले होते. भाजपने आज व्ही. के. शशिकला यांना सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये समाविष्ट करायचे आहे की नाही याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे म्हटले होते. तर शशिकला तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्ती होत्या. 

निवडणुकीचा निकाल पाहून ममतांना बसेल करंट; वाचा कोण म्हणालं असं

दरम्यान, तमिळनाडू मध्ये 234 जागांसाठीच्या विधानसभेच्या निवडणुका एप्रिल महिन्याच्या सहा तारखेला होणार आहेत. आणि एकाच टप्प्यात या निवडुका पार पडणार आहेत. गेल्या आठवड्यातच निवडणूक आयोगाने राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच चार राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. आणि त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये मतदान 27 मार्च, केरळ मध्ये 6 मार्च, आसाम मध्ये 27 मार्च आणि पुद्दुचेरी 6 एप्रिल रोजी मतदान सुरु होणार आहे. तर सर्व राज्यांमधील निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे.      

 

संबंधित बातम्या