'तिने स्वत: तिच्या नाकावर वार केले'; त्या Zomato डिलिव्हरी बॉयचा पलटवार

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

कंटेट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतरचा व्हिडिओ पोस्ट केला होता.

बंगळूरु: झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्यावर हल्ला केला असा आरेप बंगळूरुमधील एका महिलेने केला होता. ऑर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून त्याने घरात घुसून आपल्याला मारहाण केली असं महिलेने सांगितले होते. कंटेट क्रिएटर असणाऱ्या हितेशा चंद्राणीने मारहाणीनंतरचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हितेशाच्या नाकामधून रक्त येत होतं.

मारहाणीनंतर आपली ही अवस्था झाली असल्याचे तिने सांगितले होते. दरम्यान झोमॅटोने या घटनाक्रमानंतर लगेच प्रतिक्रिया देत आमचा स्थानिक प्रतिनिधी तुम्हाला पोलिस तापासामध्ये मदत करणार असल्याचे आश्वासन दिले होते.माझी झोमॅटो डिलिव्हरी उशिरा आली त्यावेळी मी त्यावेळी कस्टमर केअरशी बोलत होते, दरम्यान डिलिव्हरी बॉयने हे केलं. त्याने मला रक्तबंबाळ केलं आणि त्याच अवस्थेत सोडून त्याने तिथून पळ काढला होता, असं हितेशाने सांगितले.

ऑर्डर रद्द केल्य़ामुळे झोमॅटो डिलिव्हरी बॉयने चक्क महिलेचं नाक फोडलं

या संपूर्ण प्रकारानंतर झोमॅटोने निवेदन प्रसिध्द करत संबंधीत व्यक्तीला हटवण्यात अल्याची माहिती दिली. झोमॅटोने या प्रकारावर माफी मागत भविष्यात अशा कोणत्याही प्रकारची घटना होणार नाही या संबंधीची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं आहे. दरम्यान या झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या विरोधात पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.

मात्र यानंतर डिलिव्हरी बॉयने कंटेट क्रिएटर हितेशा चंद्राणीवर अरोप केला आहे. तिच्यावर हल्ला मी केला नाही. तिने स्वत:हून तिच्यावर हल्ला केला आहे.

 

संबंधित बातम्या