भारतरत्नचा अपमान असल्याचे म्हणत शिवानंद तिवारींचा सचिन तेंडुलकरवर हल्लाबोल

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधित सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटनंतर बिहारचा आघाडीचा राजकीय पक्ष आरजेडीने सचिन तेंडुलकर हल्लाबोल केला आहे.

दिल्ली - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधित सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटनंतर बिहारचा आघाडीचा राजकीय पक्ष आरजेडीने सचिन तेंडुलकर हल्लाबोल केला आहे. लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय असलेले नेते शिवानंद तिवारी यांनी सचिनच्या वक्तव्यावर कडक आक्षेप घेतला आहे. सचिनवर टीका करताना शिवानंद यांनी, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच अशा लोकांना भारतरत्न देणे हा या सन्मानाचा अपमान असल्याची पुस्ती शिवानंद तिवारी यांनी जोडली आहे. त्यामुळे आरजेडीने देशाच्या सर्वोच्च सन्मानावर बोट ठेवल्यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

कॉमेडियन मुनव्वर फारुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार शिवानंद तिवारी यांनी सचिनने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटवर बोलताना सचिनला भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य नव्हता, असे म्हटले आहे. याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळणारे लोक वेगवेगळ्या ब्रँडचा प्रचार करतात. हा तर देशाचा 'भारतरत्न' सम्नानाचा अपमान आहे, असे म्हणत शिवानंद यांनी सचिनच्या केलेल्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली.

जनता दलाचे ​​नेते संजय सिंह यांनी, शिवानंद तिवारी यांचे विधान त्यांच्या पक्षाची मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. तर, आरजेडीचे जेष्ठ नेते मृत्युंजय तिवारी यांनी शिवानंद यांच्या वक्तव्याचा बचाव करत, सचिनने क्रीडा क्षेत्रात अधिक चांगले काम केले असून, यात तीळ मात्र शंका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र सचिनला प्रत्येक क्षेत्रातील माहिती असेलच असे नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले.  

दरम्यान, सचिनने शेतकरी आंदोलनावरून ट्विट करताना, भारताची एकता आणि अखंडतेशी कोणतीही समझोता होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. व बाहेरील लोकांनी देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करु नये, बाहेरील लोक केवळ प्रेक्षक असू शकतात. त्यामुळे भारताच्या अंतर्गत प्रकरणात भागीदार होऊ शकत नसल्याचे सचिनने आपल्या ट्विट मध्ये लिहिले होते. त्यानंतर पुढे सचिनने भारतातील लोकांना आपल्या देशाबद्दल योग्यप्रकारे माहिती आहे आणि ते योग्य समजतात, असे म्हणत भारतीय आपल्या देशाच्या हिताचा निर्णय घेतील, असे सचिनने म्हटले होते. 

'ही' राज्ये सोडून होणार देशभरात शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

त्यानंतर, शेतकरी चळवळीला चिथावणी देण्यासाठी परकीय घटक पुढे आल्यानंतर हा विषय बिकट झाला आहे. एकामागून एक, अनेक परदेशी व्यक्ती शेतकरी चळवळीबद्दल सोशल मीडियावरून वक्तव्य करीत आहेत. पॉप स्टार रिहाना, पर्यावरणीय कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले आहे.

संबंधित बातम्या