शिवराज सिंह चौहान यांनी सांगितला 'राहुल' नावाचा अर्थ

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीका करत काँग्रेसला धारेवर धरले. यावेळी शिवराज सिंग चौहान यांनी राहुल यांच्या नावाचा फुल फॉर्म सांगितला. 

आसाम मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आसाम मध्ये सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते रान पिंजून काढताना दिसत आहेत. आज शिवराज सिंह चौहान यांनी आसाम मधील कामरूप जिल्ह्याच्या पलासवाडी विधानसभा क्षेत्रात प्रचार सभा घेतली. शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींवर टीका करत, काँग्रेसला धारेवर धरले. यावेळी यांनी राहुल त्यांनी राहुल यांच्या नावाचा फुल फॉर्म सांगितला. 

''भारताने मतदानाच्या वेळी तटस्थ राहून तमिळ लोकांच्या भावनांचा... 
भारतीय जनता पक्षाच्या कामरूप जिल्ह्यातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना  राहुल यांच्या नावाचा फुल फॉर्म सांगितला.  यावेळी त्यांनी राहुल चा फुलफॉर्म  R म्हणजे रिजेक्टेड, A म्हणजे अबसेन्ट माईंडेड, H म्हणजे होपलेस,  U म्हणजे युजलेस, आणि L म्हणजे लायर अर्थात खोटारडा असा सांगितला. राहुल गांधी हे काँग्रेस साठीच काही करू शकले नाही तर, आसाम साठी काय नकरणार असा प्रश्न देखील, शिवराज सिंह चौहान यांनी केला. शिवराज सिंह चौहान यांनी त्यापुढे 'राहूल गांधी हे नेहमी मोठ्या मात्र खोट्या घोषणा करत असतात, त्यांच्या घोषणांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनाच विश्वास नाही. ते ज्या योजनांच्या घोषणा करतात, त्यावर काँग्रेस कार्यकर्तेसुद्धा विश्वास ठेवत नाहीत तर, इतर लोक काय विश्वास ठेवतील' असा घणाघात केला.

दरम्यान, प्रचार सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना, आसाम मध्ये  दिलेले कोणतेही वचन  काँग्रेस पूर्ण करणार नाही, काँग्रेस आसाम मध्ये 100 टक्के भ्रष्टाचार करेल, काँग्रेस आसाम मधील घुसकोरांना संरक्षण देईल, तसेच आसामच्या संस्कृतीचा सन्मान काँग्रेस ठेवणार नाही, असा आरोप शिवराज सिंग यांनी केला.  

संबंधित बातम्या