ओवीसींना बिहारमध्ये झटका? 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

असदुद्दीन ओवीसी यांच्या पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. मात्र ओवीसींना बिहारमध्ये राजकिय झटका बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

पटना: असदुद्दीन ओवीसी यांच्या पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकी पाच जागा जिंकल्या. मात्र ओवीसींना बिहारमध्ये राजकिय झटका बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एमआयएम पक्षाचे पाच आमदारांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली असल्याने बिहारमध्ये पक्षांतराची चर्चा सुरु झाली आहे. बिहार मधील एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अख्तर उल इमाम  यांच्यासह अहमद अजहर असफी, शहनवाज आलम, सयद रुकनुद्दीन  आणि अजहर नियामी या पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. 

आमदार आदिल हसन यांनी,''आम्ही सीमांचलच्या विकासाच्या संदर्भात मुख्यमंत्र्याची भेट घेतली असल्याचे म्हटले. आमच्या पक्षाचा भाजपबरोबर वाद आहे, नितीशकुमार यांच्यासोबत नाही. एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवीसी नितीश कुमार यांच्या बरोबरीने हात मिळवणी  करण्यासाठी तयार होते. मात्र भाजपबरोबर असणारी युती त्यांनी  तोडली असती तर असेही आदिल यांनी म्हटले. तसेच एनडीएमधून नितीश कुमार  बाहेर पडल्यास आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येण्यासाठी तयार आहोत. आम्ही भविष्यातही मुख्यमंत्र्याची भेट घेत राहू'' असेही ते म्हणाले.

तर दुसरीकडे नितीश कुमार यांच्या पक्षाची एमआयएम आमदारांवर नजर असल्याची चर्चा  बिहारच्या राजकिय वर्तुळात  चांगलीच रंगली आहे. त्यामुळे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत आपला करिष्मा दाखवणारे असदुद्दीन ओवीसी यांना राजकिय दणका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या