धक्कादायक! अलिगढमध्ये विषारी दारु प्यायल्याने 22 जणांचा मृत्यू

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 30 मे 2021

या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) वाढत असतनाना दुसरीकडे मात्र उत्तरप्रदेशमधील (Uttarpradesh) अलीगढमध्ये(Aligarh) विषारी दारु (liquor) प्यायल्याने 22 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आताही काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विषारी दारुमुळे काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेक जणांचे संसार उध्द्वस्त झाले आहेत. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 5 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. तर आरोपी मुनिष आणि ऋषी शर्मा यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यांना पोलिसांनी 50 हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे.

लोधा भागातील करसुआ, निमाना, अंडला आणि हेवतपूर गावातील नागरिकांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच पिडित कुटुंबियाना मदत करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर महसूल विभाग जागा झाला आहे. जिल्हाअधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.  ''या प्रकरणासंबंधी मॅजेस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याचा तपास अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील अधिकारी करणार आहेत. तसेच दोषींविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत,'' असं अलिगढ जिल्हाधिकाऱ्यांना (Aligarh District Collector) सांगितलं आहे.

 

बांग्लादेशी तरुणीवर सामूहिक अत्याचार; व्हायरल व्हिडिओवरुन पाच नराधम गजाआड

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी देशी दारुचे अड्डे सील केले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

संबंधित बातम्या