धक्कादायक! भाजप नेत्याच्या मुलीवर अत्याचार

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

पलामू जिल्ह्यतील लालीमती जंगलामध्ये बुधवारी एका 16 वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला.

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र झारखंडमधील (Jharkhand) पलामूमधून (Palamu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पलामू जिल्ह्यतील लालीमती जंगलामध्ये (Lalimati forest) बुधवारी एका 16 वर्षीय मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. या हत्येनंतर अल्पवयीन मुलीच्या एका डोळ्याला इजा पोहोचवून तिचे शरीर झाडावर टांगण्यात आले, अशी माहिती पलामू पोलिसांनी (Palamu Police) दिली असून पुढील तपास सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. (Shocking Atrocities on BJP leader's daughter)

सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक भाजप नेत्याची ही अल्पवयीन मुलगी असल्याचे प्रथमदर्शिनी समोर आले आहे. पांकी पोलिस स्टेशन (Panki Police) परिसरात ती आपल्या कुटुंबासमवेत राहत होती आणि इयत्ता दहावीत शिकत होती. सदर मुलीवर बुधवारी संध्याकाळी अत्यंसस्कार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या अल्पवयीन मुलीला पाच भावंडे असून ती सर्वात मोठी होती.

बहिणीने सख्या भावासोबतच बांधली लग्नगाठ; जाणून घ्या

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एक मोबाईल फोन जप्त केला असून त्याच्या कॉल डिटेलच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रदीपकुमार सिंग धानुक (Pradeep Kumar Singh Dhanuk) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रदीप कुमार याचे लग्न झाले असून त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सदर अल्पवयीन मुलगी 7 जून रोजी सकाळी 10 वाजल्यानंतर बेपत्ता झाली होती, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली. 8 जून रोजी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना देत पोलिस स्टेशनध्ये तक्रार नोंदवली  होती. पलामू पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केल्यानंतर तिचा मृतदेह एका झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळून आला. हा मृतदेह कापडाने झाडाला टांगला होता. तसेच तिचा उजवा डोळा फोडलेला दिसून आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर सविस्तर माहिती देण्यात येईल, अशी माहिती पांकी पोलिस स्टेशनचे अधिकारी अशोक कुमार (Ashok Kumar) यांनी दिली आहे. 

अंत्यसंस्कार केलेली महिला 15 दिवसांनी घरी पोहोचली अन सगळेच घाबरले

आरोपीने हत्येपूर्वी अल्पवयीन मुलीला मारहाण केली होती. अल्पवयीन मुलगी बेपत्ता होण्यापूर्वी काही दिवसापूर्वी आरोपी आणि पीडीतेच्या कुटुंबामध्ये भांडण झाले होते. त्यातून ही धक्कादायक घडली असल्याची माहिती यावेळी  पोलिसांनी दिली. झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतुल सहदेव (Pratul Sahadeva) यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या