धक्कादायक: पोटच्या गोळ्याला विकून दाम्पत्याने घेतली कार

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

बाळाच्या आजी आजोबांनी या प्रकरणाची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

देशात कोरोना थैमान घालत असताना उत्तरप्रदेशातील (UttarPradesh)  कन्नोजमधून (Kannauj) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पंत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या पोटच्या बाळाला विकल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. या दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्याला एका व्यवसायिकाला दीड लाखांना विकलं आणि त्यामधून सेंकड हॅंड कार (Car)  विकत घेतली. बाळाच्या आजी आजोबांनी या प्रकरणाची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना त्वरित या प्रकरणी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shocking The couple bought a car after selling a stomach pill)

कन्नोजमधील तिरवा कोतवाली भागातील सतौरमध्ये तीन महिन्यांपूर्वी नवजात बाळाचा जन्म झाला होता. मात्र या दाम्पत्याने पैशाच्या हव्यासापोटी आणि कार विकत घेण्यासाठी नवजात बाळाला गुरसहागंजमधील एका मोठ्या व्यवसायिकाला विकले आहे. अवघ्या तीन महिन्याच्या बाळाला दीड लाख रुपयांना त्यांनी व्यवसायिकाच्या हाती सुपुर्द केलं होतं. तसेच या दाम्पत्याने बाळ विकल्यानंतर आठ दिवस कुणालाही कळू दिलं नव्हतं. मात्र नवजात बाळाच्या आजी आजोबांना ही बाब लक्षात आल्यानंतर तात्काळ पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तक्रार ऐकूण सुरुवातीला पोलिसांनाही धक्का बसला.

लव्ह यू जिंदगी म्हणत कोरोनाशी लढा देणाऱ्या महिलेने दिला जगाला निरोप

त्यांनी या प्रकरणामध्ये पोलिस दाम्पत्याची चौकशी केली आणि सदर घटनेचा खुलासा झाला. ‘’या दाम्पत्याचे नवजात बाळ अजूनही व्यवसायिकाच्या ताब्यात आहे. या प्रकरणी आम्ही दाम्पत्याची चौकशी करण्यात येत आहे. या दाम्पत्याने नुकतीच एक सेंकड हॅंड कार खरेदी केली आहे,’’ असं पोलिस निरिक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं आहे.
 

संबंधित बातम्या