धक्कादायक! गुगलवर सर्च करुन दिलं इंजेक्शन; प्रकरण बेतलं चिमुकल्याच्या जीवावर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

ओडिशातील दाबुगामधील एका हेल्थ केअर सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. सहा महिन्यापूर्वीच या लहान चिमुकल्याला न्यूमोनिया झाला होता.

मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णासाठी डॉक्टर हाच शेवटचा पर्याय असतो. परंतु डॉक्टरांकडूनच जर चूक झाली तर? अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टर महाशयांनी गुगलवरील माहीतीच्या आधारे एका लहान चिमुकल्याला इंजेक्शन दिलं. यानंतर इंजक्शनमुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चिमुकल्याच्या आई वडिलांनी केला आहे. मात्र आईवडिलांनी केलेला आरोप वैद्यकिय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहेत.
ओडिशातील दाबुगामधील एका हेल्थ केअर सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. सहा महिन्यापूर्वीच या लहान चिमुकल्याला न्यूमोनिया झाला होता.

चिमुकल्याला घेऊन आई वडील डॉक्टरांकडे गेले होते. या डॉक्टर महाशयांनी गुगलवर माहीती घेऊन बाळाला इंजेक्शन दिलं. त्या इंजेक्शनंतर बाळाचा मृत्यू झाला, असा आरोप आई वडिलांकडून करण्यात आला आहे. (Shocking I did a Google search and injected The case hit Chimukalyas soul)

‘’आमच्या मुलाला 30 मार्चच्या रात्री अचानक खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्याची प्रकृती एकदम खलावली. त्यालं बरं वाटत नसल्यामुळे आम्ही त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाला दाबुगाम येथील आरोग्य सेवा केंद्रात दाखल केलं. बाळाला तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांनी गुगलवर ओषधासंबंधी माहीती शोधली. आणि त्यानंतर डॉक्टरांनी औषधांची यादी लिहून दिली,’’ असा आरोप बाळाच्या आई वडीलांनी केला आहे.

NCB ला मोठे यश! दाऊदचा ड्रग्स कारखाना चालवणाऱ्या दानिश ला अटक

‘’डॉक्टरांनी बाळाला इंजेक्शन देण्याचा सल्ला आम्हाला दिला. त्याला कोणतं इंजेक्शन द्याव हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी ते गुगलवर शोधलं. जेव्हा त्यांनी माझ्या बाळाला इंजेक्शन दिलं त्यानंतर काही क्षणातच बाळाने डोळे मिटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला,’’ असा आरोप ओडीशामधील माध्यमाशी बोलताना सांगितलं.

ते पुढेही म्हणाले, डॉक्टरांनी आम्हाला खबरदारी म्हणून वेळेवर उमरकोट येथील रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला नाही. जिथे आमच्या बाळाचा उत्तम उपचार झाला असता.’’

तर दुसरीकडे गुगलवर माहीती सर्च करुन औषधोपचार केल्याचा आरोप आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांने फेटाळून लावला आहे. वैद्यकीय अधिकारी सुभासीस साहू म्हणाले, ‘’बाळाच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा निष्कळजीपणा करण्यात आला नाही. मुलगा न्यूमोनियामुळे त्रस्त झाला होता आणि त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. योग्य औषधांचा वापर करण्यात आला होता. ते बाळाला उमरकोटच्या रुग्णालयामध्य़े घेऊन जात असताना त्याची प्रकृती खलावल्यानंतर मधूनच ते परत आले. जेव्हा ते परत आले तोपर्यंत बाळाची प्रकृती खूपच गंभीर जाली होती, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 
 

संबंधित बातम्या