धक्कादायक! अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती परतली घरी; कुटुंबियांची उडाली झोप

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

राजस्थानमधील आरके हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असलेल्या गोवर्धन प्रजापत नावाच्या व्यक्तीचा मृतदेह अज्ञात असल्याचे सांगण्यात आले होते.

राजस्थानीतल (Rajsthan) राजसमंद येथील एका कुटुंबाने परिवारातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले होते. यानंतर आठवड्यानंतर ती व्यक्ती पुन्हा घरी परतल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील आरके हॉस्पीटलमध्ये (R. K. Hospital) उपचार घेत असलेल्या गोवर्धन प्रजापत नावाच्या व्यक्तीचा मृतदेह अज्ञात असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयाने तो मृतदेह ओमकारलाल गाडोलिया नामक व्यक्तीचा असल्याचे सांगत मृतदेह नातेवाईकांना दिला. त्यानंतर गाडोलियाच्या नातेवाईकांना त्याच्यावर अत्यंस्स्कार केले. मात्र दहा दिवसांनी ओमकारलाल घरी परतला होता, त्याने दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. (Shocking The mourner returned home Sleep deprived family)

11 मे रोजी दारुचे व्यसन असलेला ओमकारलाल कुटुंबियांना न सांगताच उदयपूरला गेला होता. यकृताच्या आजारामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो तिथे उपचार घेत होता. राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर ओमकारलालचे कुटुंब त्याच्या भावाच्या घरी राहत होते. त्याच दिवशी गोवर्धन प्रजापतला आरके रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

कोरोनाला रोखण्यासाठी भाजप आमदाराकडून चालतं फिरतं हवन

''आम्हाला रुग्णालयामधील अधिकाऱ्यांकडून एक पत्र मिळालं होतं. मागील तीन दिवसांपासून शवगृहात एक अज्ञात मृतदेह बेवारस पडलेला आहे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी मृत व्यक्तीचा फोटो पाठवला होता. त्यानंतर 15 मे रोजी डझनभरहून अधिक लोक मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी रुग्णालयात आले. त्यानंतर एका कुटुंबाने ओळख पटवली होती. त्यांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी लेखी पत्रही दिले. ओमकारलाल गाडोलियाच्या उजव्या आणि डाव्या हातावर जखम असल्याचे त्यांनी सारखाच वाटणारा गोवर्धनचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी शवविच्छेदन आणि डीएनए चाचणी न करता मृतदेह तसाच कुटुंबियांच्या ताब्यात दिला. मात्र तो मृतदेह कुटुंबियांनी ओळखला,'' असं कांकरोली पोलिस स्टेशनचे अधिकारी योगेंद्र व्यास यांनी सांगितले आहे.

15 मे रोजी गाडोलिया कुटुंबाने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. परंतु 23 मे रोजी ओमकारलाल घरी आला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केलेला मृतदेहाबद्दल माहिती मिळवली.

संबंधित बातम्या