धक्कादायक! कोरोनाच्या लसी ऐवजी महिलांना देण्यात आली रेबीजची लस

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

 तीन वयस्कर महिलांना कोरोनाची लस देण्याऐवजी रेबीजची लस देण्यात आली.

श्यामली: देशभरात लसीकरणाची मोहीम सुरु झाली असताना आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तीन वयस्कर महिलांना कोरोनाच्या लसी देण्याऐवजी रेबीजची लस देण्यात आली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी यासंबंधी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये ही घटना घडली आहे. केंद्रसरकार आणि राज्यसरकार वारंवार पात्र लोकांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन करत आहे. एकीकडे लसीकरणासाठी आरोग्य केंद्राबाहेर लोक रांगा लावत असताना उत्तरप्रदेशातील या घटनेनंतर आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

उत्तरप्रदेशमधील श्यामली जिल्ह्यातील आरोग्य केंद्रामध्ये सरोज (70) अनारकली (72)  आणि सत्यवती (60)  या कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या होत्य़ा. कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी त्या आरोग्य केंद्रामध्ये पोहचल्या असत्या आरोग्य केंद्रामधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना  प्रत्येकी 10 रुपयाचं इंजेक्शन घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं. यानंतर त्यांना कोरोनाची लस देण्याऐवजी रेबीजची लस देण्यात आली. (Shocking The rabies vaccine was given to women instead of the corona vaccine)

लॉकडाऊनची भीती: कामगारंच्या राष्ट्रीय महामार्गावर रांगा

रेबीजची लस घेतलेल्या तिन्ही महिला अशिक्षित आहेत. लस घेतल्यानंतर त्या घरी पोहचल्या होत्या. यावेळी या एका महिलेची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर नातेवाईकांनी या महिलेला एका खासगी डॉक्टरांकडे घेऊन गेले असता आरोग्य केंद्राने लस दिल्यानंतर दिलेलं प्रिस्क्रिपश्न पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना महिलेला रेबीजची लस देण्यात अली असल्याचं नातेवाईकांना सांगितलं.

महिलांच्या नातेवाईकांनी यासंबंधी अधिक चौकशी करता आरोग्य केंद्रामधील निष्काळजीपणा समोर आला. यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रामध्ये एकच गोंधळ घातला. दरम्यान झालेल्या प्रकारबद्द्ल संताप व्यक्त करतानाच महिलांच्या नातेवाईकांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी संजय अग्रवाल यांच्याकडे दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. 
 

संबंधित बातम्या