वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा; 'दोन डोसमधलं अंतर कमी करण्याची शिफारस केली नव्हती'

वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा; 'दोन डोसमधलं अंतर कमी करण्याची शिफारस केली नव्हती'
VACCINE 3.jpg

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना मागील महिन्यात 13 मे रोजी केंद्र सरकारने कोविशील्ड (Covishield) लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरुन दुप्पट करत 12 ते 16 निश्चित करण्यात आले होते. मात्र हा निर्णय वैज्ञानिकांनी (scientists) केलेल्या शिफारसीनुसार घेतला असल्याचे सांगण्यात आले. परंतु आता त्याच वैज्ञानिकांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. कोरोना लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा या वैज्ञानिकांच्या गटातील तीन सदस्यांनी केला आहे. यासंबंधीचं वृत्त रॉटर्सनं दिले आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या (Modi government) या निर्णयवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुणाच्या सांगण्यावरुन झाला निर्णय?
देशात एकीकडे कोरोना लसींचा तुटवडा असल्याचे समोर येत असताना दुसरीकडे मोदी सरकारने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर 12 ते 16 करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी मोदी सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप इम्युनायझेशन या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरुन हा निर्णय घेतल्याचे देखील जाहीर करण्यात आले. या गटाने लसींचे अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिले नव्हते, असा खुलासा यापैकी काही तज्ञांनी केला आहे. (The shocking revelation of scientists Reducing the distance between two doses was not recommended)

लसींच्या दोन डोसमधलं अंतर 12 आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर...!
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजीचे (National Institute of Epidemiology) माजी संचालक एम. डी. गुप्ता (M. D. Gupta) यांनी माध्यमाशी बोलताना, NTAGI च्या वैज्ञानिकांनी 8 ते 12 आठवड्यांपर्यंत लसींमधील अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) देखील सल्ला देण्यात आला आहे. परंतु केंद्र सरकारचे 12ते 16 आठवडे आहेत.  दोन लसींच्या डोसमधील अंतर 12 आठवड्यांपेक्षा डास्त झालं किंवा 12 आठवड्यानंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणत्याही स्वरुपाचा डाटा NTAGI कडे नाही” असे गुप्ता यांनी म्हटले.  NTAGI मधील दुसरे सदस्य असलेले मॅथ्यु वर्गेस (Matthew Verges) यांनी देखील एम. डी. गुप्ता यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.  NTAGI ने फक्त 8 ते 12 आठवड्यांपर्यंत अंतर वाढवावे असा सल्ला दिला होता, असं ते म्हणाले.

लसींमधील अंतर 12 ते 16 आठवडे करा असं आम्ही म्हटलो नाही!
दरम्यान, NTAGI मधील अजून एक सदस्य जे. पी. मुलीयिल यांनी देखील दुजोरा दिला, दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत या तज्ञांच्या गटामध्ये चर्चा तर झाली. परंतु आम्ही कधीही 12 ते 16 आठवडे करावे असे  आम्ही म्हणालो नाहीत. नेमके त्यासंबंधीचे आकडे सांगितलेच गेले नव्हते असे ते म्हणाले. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशातील अनेक घटकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे असा निर्णय घेतला असल्याचे अरोप झाले होते. मात्र हा निर्णय लसींच्या तुटवड्यामुळे नसून वैज्ञानिकांच्या शिफारशींनुसार घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते.

दरम्यान, मोदी सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या पध्दतीवर भारताचे अग्रणी वायरोलॉजिस्ट शाहीद जमील (Shahid Jameel) यांनी देखील यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. दोन लसींच्या डोसमधील अंतर दुप्पट करण्याच्या निर्णयामागची कारणं संबंधित यंत्रणांनी स्पष्ट करावीत.  


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com