शेतकरी आंदोलनासंदर्भात भाजपच्या मंत्र्यांचं धक्कादायक विधान

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांबद्दल धक्कादायक विधान केलं आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. विरोध करत असताना अनेक शेतकऱ्यांचा मृत्यृही झाला आहे. मात्र हरियाणाचे कृषीमंत्री जे.पी. दलाल यांनी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांबद्दल धक्कादायक विधान केलं आहे. ''आंदोलनस्थळी मरण पावलेले शेतकरी घरी असते तरी ते मेले असते'' असं कृषीमंत्री दलाल यांनी म्हटले आहे. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टिका करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र दलाल यांनी खुलासा करत सारवासारव केली.
कृषीमंत्री जे.पी. दलाल यांचा भिवानीमध्ये झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दलाल यांना कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान मृत झालेल्या शेतकऱ्यांबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर ''आंदोलनाच्या ठिकाणी मरण पावलेले शेतकरी घरी असते तरी मेले असते. इथे मरत नाहीत का ? लाख दोन लाखांपैकी सहा महिन्यात दोनशे लोक मरत नाहीत का? कोणी ह्रदयविकाराने  मेले, कोणी ताप आल्याने मरण मेले,'' असं दलाल यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आम आदमी पक्षाने ट्वीट केला आहे.

शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा केंद्र सरकारला जाहीर इशारा

एखाद्या घटनेत काही लोकांचा मृत्यृ झाल्यास पंतप्रधान दु:ख व्यक्त करतात. मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत  असं दिसंल नाही. त्यावर कृषीमंत्री दलाल म्हणाले, ''हे लोक एखाद्या दुर्घटनेत मरण पावलेले नाहीत, ना ते स्वत:च्य़ा इच्छेने. मृत्यृ झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियासोबत आमच्या संवेदना आहेत.'' दलाल यांच्या या वक्तव्यानंतर मोठ्याप्रमाणात वादंग निर्माण झाला आहे. यापूर्वीही भाजप नेत्य़ांकडून अशी वादग्रस्त विधाने केली आहेत. कधी त्यांना 'पाकिस्तानी, खलिस्तानी आतंकवादी' अशी संबोधने कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना लावण्यात आली होती. शेतकरी आंदोलनावरुन विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला संसदेत घेरण्याचा सुरुवात केली आहे. 

संबंधित बातम्या