आरोग्य मंत्रालयाला कारणे दाखवा नोटीस

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

कोरोनाकाळात केंद्र सरकार प्रचंड आग्रही असलेले ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल ॲप्लीकेशन कोणी बनवले, त्याचे नेमके फायदे काय? याची माहिती देण्यास खुद्द राष्ट्रीय माहिती केंद्रानेच (एनआयसी) कानावर हात ठेवल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली : कोरोनाकाळात केंद्र सरकार प्रचंड आग्रही असलेले ‘आरोग्य सेतू’ हे मोबाईल ॲप्लीकेशन कोणी बनवले, त्याचे नेमके फायदे काय? याची माहिती देण्यास खुद्द राष्ट्रीय माहिती केंद्रानेच (एनआयसी) कानावर हात ठेवल्याचे समोर आले आहे.

एका माहिती अधिकार याचिकेतील याबाबतच्या प्रश्‍नांना ‘एनआयसी’ने गुळमुळीत व मोघम उत्तरे दिल्याबद्दल केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व माहिती तंत्रज्ञान (दूरसंचार) मंत्रालयांना कारणे दाखवा नोटीस नुकतीच बजावली आहे. सौरव दास या माहिती अधिकार कार्यकर्त्याने ‘आरोग्य सेतू’च्या निर्माणकर्त्याबाबतचे प्रश्‍न विचारले होते. मात्र मंत्रालयांसह संबंधित संस्थांनी ‘आपल्याला त्याबाबत काहीही माहिती नाही, असे सांगितले.

संबंधित बातम्या