Shraddha Walker: श्रद्धा वालकरच्या हत्येचे खरे कारण आले समोर

Shraddha Walkar: अफताबने श्रद्धाचा कसा खून केला याबाबत सतत नवीन माहीती समोर येताना दिसत आहे.
Shraddha Walkar
Shraddha WalkarDainik Gomantak

Shraddha Walkar: श्रद्धा वालकर हत्याप्रकरण मागच्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. यामध्ये सतत नवनवीन खुलासे होताना दिसून येत आहे. अफताबने श्रद्धाचा कसा खून केला याबाबत सतत नवीन माहीती समोर येताना दिसत आहे.

श्रद्धाची हत्या होताना कशाप्रकारे घडामोडी घडल्या आणि अफताबने खून का केला याबाबतची एक नवीन माहीती समोर आली आहे. श्रद्धा आपल्या हरियाणा( Haryana )च्या मित्राला भेटालया गेल्याने अफताब श्रद्धावर नाराज होता. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धाची आणि या हरियाणाच्या मित्राची एका मोबाईल अॅपवरुन ओळख झाली होती.

मित्राला भेटण्यासाठी ती गुरुग्रामला गेली होती मात्र रात्री ती परत न आल्याने अफताब तिच्यावर नाराज होता. दुसऱ्यादिवशी ती परत आल्यावर अफताब आणि श्रद्धामध्ये भांडण झाल्याचे पोलीसांना माहिती मिळाली आहे.

पोलीसांनी या वादातूनच हा खून झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, श्रद्धाचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आला आहे. तिच्या संपूर्ण शरीराचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर, तिच्या शरीराचे काही अवयव जंगलात फेकून देण्यात आले होते.

Shraddha Walkar
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचं नेमकं कारण काय?

श्रद्धा आणि अफताब हेसुद्धा एका मोबाइल अॅपद्वारे भेटले होते. दिल्ली( Delhi )मध्ये ते एकत्र राहत होते. श्रद्धाच्या घरच्यांचा या नात्याला विरोध होता. त्यामुळे तिचा तिच्या घरच्यांशी संबंध नव्हता, मात्र बरेच दिवस श्रद्धा सोशल मिडियावर अॅक्टीव्ह दिसत नसल्याने श्रद्धाच्या घरच्यांना संशय आला. त्यानंतर या हत्याप्रकरणाचा उलगडा झाला. पोलीस( Police) या हत्याप्रकरणाचा शोध घेण्यासाठी मोठ्या वेगाने काम करत आहेत. लवकरच अफताबला शिक्षा होईल असे पुरावे न्यायालयात सादर करु असे पोलीसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com