Siddharamaiah: गोव्यातून कर्नाटकात होणाऱ्या दारू वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवा; अवैध मद्यवाहतूक रोखा

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे आदेश; 36 हजार कोटी महसुलाचे लक्ष्य
Siddharamaiah
Siddharamaiahgoogle image

Siddharamaiah on Illegal liquor transport from Goa: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्यातील अवैध दारूला आळा घालण्याचे निर्देश दिले.

बेकायदेशीर दारू रोखण्यासह कर थकबाकी वसूल करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले आहेत. सिद्धरामय्या यांनी विधान सौधामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

Siddharamaiah
Goa Medical College: मृत्यूनंतरही दिले चौघांना जीवदान; 'गोमॅको'तून हृदय पाठवले चेन्नईला, यकृत दिल्लीला...

दरम्यान, कर्नाटकचे चालू वर्षासाठी अबकारी विभागाचे महसूल संकलनाचे उद्दिष्ट 36 हजार कोटी रुपये आहे. कर संकलनाचा वाढीचा दर 5.31 टक्के आहे. सर्व अधिकार्‍यांनी निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, अंमलबजावणी यंत्रणांनी राज्याच्या सीमावर्ती भागात विशेषतः गोव्यातून होणाऱ्या दारूच्या अवैध वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. गरीबांच्या उत्पन्नावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने अवैध दारूचे उत्पादन आणि विक्री बंद करावी.

कर थकबाकी गोळा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. उत्पादन शुल्क विभागातील सुधारणांच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला 100 दिवस पूर्ण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com