बहिणीने सख्या भावासोबतच बांधली लग्नगाठ; जाणून घ्या

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 जून 2021

या प्रकरणात भाऊ आणि बहिणीचं नव्हे तर घरामधील सर्व नातेवाईक सामील होते. 

देशात कोरोनाचा संसर्ग (COVID19) वाढत असताना पंजाबमधून (Punjab) सर्वांना बुचकाळ्यात टाकणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने चक्क आपल्या सख्या भावासोबत लग्नगाठ बांधली आहे. तिला लग्नाचे कारण विचारले असता, विदेशात शिप्ट होण्याचे कारण तिने सांगितले. विवाहानंतर तिने फेक पासपोर्ट तयार करुन ती ऑस्ट्रेलियाला (Australia) गेली. यासंबंधीची तक्रार एका महिलेने पोलिस स्टेशनमध्ये केल्यावर ही घटना सर्वांच्या समोर आली आहे. या प्रकरणात भाऊ आणि बहिणीचं नव्हे तर घरामधील सर्व नातेवाईक सामील होते.  (0The sister tied the knot with her brother Find out)

परदेशात जाण्याचं पंजाबमधील एका तरुणीने ठरवलं होतं, परंतु तिला व्हिसा मिळण्यास अडथळे येत होते. पोलिस अधिकारी जय सिंह  म्हणाले की, ''तपास केला असता तरुणीचा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. खोटी कागदपत्रे त्याच्या बहिणीने तयार करुन मॅरेज सर्टिफिकेट गुरुद्वारामधून तयार  करुन त्यासंबंधीची परवानगी ऑफिसमधून घेतली होती.''

VIDEO: पत्त्यांच्या बंगल्यासारखाच ढासळला NH-415

पोलिस अधिकारी सिंह पुढे म्हणाले,  ''त्यांनी कायदे व्यवस्था, सामाजिक कायदे तसेच धार्मिक व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. जेणेकरुन देशातून विदेशात जाता यावे म्हणून. आम्ही त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करत होतो मात्र ते पळून जात होते. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. खोटी कागदपत्रे तयार करुन तरुणी आपल्या भावासोबत ऑस्ट्रेलियाला पळून गेली आहे.''

संबंधित बातम्या