राहुल भट हत्येचा तपास एसआयटी करणार, पत्नीला सरकारी नोकरी
sit to investigate the murder of kashmiri pandit rahul bhatDanik Gomantak

राहुल भट हत्येचा तपास एसआयटी करणार, पत्नीला सरकारी नोकरी

घटनेमुळे खोऱ्यातील काश्मिरी पंडितांमध्ये संताप

काश्मिरी पंडित राहुल भट यांच्या हत्येच्या तपासासाठी जम्मू-काश्मीर सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. यासोबतच राहुल भट यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली आहे. राहुल भट यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चही सरकार उचलणार आहे. राहुल भट यांच्या हत्येबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी हत्येचा कट असल्याचे सांगत तपासाची मागणी केली होती. (sit to investigate the murder of kashmiri pandit rahul bhat)

12 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथील तहसीलदार कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी राहुल भट यांची हत्या केली होती. हत्येपूर्वी दहशतवाद्यांनी राहुल भटचे नाव विचारले आणि नंतर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे खोऱ्यातील काश्मिरी पंडितांमध्ये संताप आहे. राहुल भट सुद्धा काश्मिरी पंडित आहेत. राहुल भट यांच्या हत्येवरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. शुक्रवारीही आंदोलकांनी निषेध नोंदवला.

sit to investigate the murder of kashmiri pandit rahul bhat
वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला लागली आग, होरपळून चौघांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये राहुल भट यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापनेची बाब समोर आली आहे. यासोबतच जम्मू-काश्मीर प्रशासनाने राहुल भट यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. याशिवाय त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही सरकार उचलणार आहे.

शुक्रवारी बांदीपोरा येथील बेरार अरागम भागात सुरक्षा दलांनी विशेष कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार केले. यातील दोन दहशतवादी फैसल उर्फ ​​सिकंदर आणि अबू उकासा यांचा राहुल भटच्या हत्येत सहभाग होता. दोन्ही दहशतवाद्यांचे लष्करशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.