शिक्षकच बनला भक्षक; 9 वर्षांच्या मुलीवर VIDEO दाखवून केला लैंगिक अत्याचार
Sitapur School headmaster shows obscene video to 9-year-old girl and sexually assaults her aap92Dainik Gomantak

शिक्षकच बनला भक्षक; 9 वर्षांच्या मुलीवर VIDEO दाखवून केला लैंगिक अत्याचार

या घटनेनंतर पिडीतेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.(Sitapur)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सीतापूर (Sitapur) येथून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. सीतापूर येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने (Sitapur School Principle) कथितरीत्या चौथीच्या विद्यार्थिनीवला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape on Child girl) केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पिडीतेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. (Sitapur School headmaster shows obscene video to 9-year-old girl and sexually assaults her aap92)

तक्रारदाराने सांगितले की ही घटना घडली तेंव्हा त्याची मुलगी 9 वर्षांची होती, इयत्ता 4 ची विद्यार्थिनी, सीतापूरच्या गोंडलामाऊ ब्लॉकमध्ये तिच्या शाळेत गेली होती. मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीला शाळेच्या आवारातील एका खोलीत बोलावले, जिथे त्याने तिला एक अश्लील व्हिडिओ दाखवला. मुलीने आरडाओरडा केला आणि प्रतिकार केला तेव्हा त्याने खोली आतून बंद केली. यानंतर, त्याने कथितरित्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केली, असे टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Sitapur School headmaster shows obscene video to 9-year-old girl and sexually assaults her aap92
मुंबईतील साकीनाक्यात महिलेवर अत्याचार करून केले भयंकर कृत्य!

अल्पवयीन मुलीने नंतर तिच्या वडिलांसमोर तिची त्रासदायक घटना सांगितली, त्यानंतर त्याने घटनेच्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुख्याध्यापकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत संबंधित आरोपही त्याच्यावर लावण्यात आले आहेत.

कथित गुन्ह्याच्या संदर्भात अटकेतील व्यक्तीची चौकशी केली जात आहे. यापूर्वीही त्याने असेच कृत्य केले होते, परंतु सामाजिक कलंक लागण्याच्या भीतीमुळे त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, असे पोलीस सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे.

Sitapur School headmaster shows obscene video to 9-year-old girl and sexually assaults her aap92
'पुन्हा निर्भया' हैदराबादमध्ये सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करुन केली हत्या

दुसऱ्या एका घटनेत कांचीपुरम पोलिसांनी एका 20 वर्षीय महिलेला फूस लावून सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक केली आहे. गुनासिलन, जेबनेसन, गुनासेकरन आणि अजित अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पाचव्या आरोपीला पकडण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.

प्रकरणाच्या तपशीलांनुसार, 20 वर्षीय महिला, जी एका खाजगी मोबाईल शॉपमध्ये कर्मचारी आहे, तिची सोशल मीडियाद्वारे गुनासेलनशी मैत्री झाली. बुधवारी, गुनासिलानने तिला तिच्या कामाच्या ठिकाणी तिच्या कारमधून उचलले आणि तिला त्याच्या फार्महाऊसवर नेले. पोलिसांनी सांगितले की तिला शामक औषधाचे शीतपेय देण्यात आले. ती भान हरपल्यानंतर, गुनासिलन आणि त्याच्या मित्रांनी चारचाकीच्या आत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com