‘’नेतृत्व व दुरदृष्टीच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली’’

This situation is due to a lack of leadership and foresight
This situation is due to a lack of leadership and foresight

देशात कोरोनाचा प्रसार (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचं पितळ उघडं पडलं आहे. ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात आता दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहेत. दिवसाला 3 लाखहूंन अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असताना 3 हजारांपेक्षा हून  अधिक कोरोना रुग्ण दगावत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आरबीयआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raguram Rajan) यांनी भारतातील या संपूर्ण परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) पूर्णपणे जबाबदार असल्याची अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे. (This situation is due to a lack of leadership and foresight)

‘’मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्वजण शांत बसले होते. जर हे सर्व सावध असते तर समजलं असतं की कोरोना अजूनही संपला नाही. ब्राझीलचं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर होतं. कोरोना अधिक प्रभावीपणे पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मात्र नेतृत्व आणि दुरदृष्टीच्या अभावामुळे ही भयावह परिस्थिती ओढावली आहे,’’ असं राजन यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

‘’मागच्या वर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे सगळ्यांना वाटलं होतं की, कोरोनाचं संकट आता संपलं. कोरोनाच्या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडलो आणि अर्थचक्र पुन्हा सुरु केलं. मात्र यामुळे आपलं चांगलंच नुकसान झालं आहे, असं त्यांनी पुढे बोलताना सांगितलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारतानं लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाची लसी तयार केल्या नाहीत. त्यांना वाटलं आपल्याकडे खूप वेळ आहे. आपण कोरोनाला हरवलं आहे. लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरु करु शकतो’, या विचारामुळेच कोरोना वाढला असल्याचे त्यांनी सांगितलं.

मार्च आणि एप्रिलनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत अधिक झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com