प्रियकराने लग्नास नकार दिल्याने संताप, तरुणीसह तिच्या 6 मैत्रिणींचं विषप्राशन

मुलींनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

बिहारच्या औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर तरुणीसह तिच्या 6 मैत्रिणींनी विष प्राशन केले. तीन मैत्रिणींचा मृत्यू झाला, तर तीन मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Crime News
लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने विष पाजलं, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, मृत तरुणींपैकी एकीचे तिच्या मेव्हण्यावर प्रेम होते. तीने आपल्या मैत्रिणींसह तरुणासमोर प्रेम व्यक्त केले आणि लग्नाची ऑफर दिली, मात्र मुलाने नकार दिला आणि निघून गेला. प्रियकराने नकार दिल्यानंतर सर्व मैत्रिणी आपल्या गावी परतल्या. मात्र नंतर प्रेम व्यक्त केलेल्या मुलीने विष प्राशन केले. यानंतर इतर मित्रांनीही तिला साथ दिल्याने सर्वांनी आलटून पालटून विषारी द्रव्य प्राशन केले.

Crime News
हिमाचल प्रदेशमध्ये 'आप'ला मोठा झटका; प्रदेश अध्यक्षच 'भाजप'मध्ये सामील

मुलींनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ जमले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन मुलींचा मृत्यू झाला. उर्वरित तीन मुलींना उपचारासाठी मगध मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले. जिथे त्याच्यांवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सीओ अवधेश कुमार सिंह, एसएचओ राजगृह प्रसाद, मुख्य प्रतिनिधी अनुज कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. गावात तीन मुलींचा एकत्रित मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असून कुटुंबीयांची (Family) दुरवस्था झाली आहे. याठिकाणी तिन्ही मुलींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी (Police) या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com