सहा राज्यांची पुन्हा न्यायालयात धाव

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

न्यायालयाने ‘नीट’ व ‘जेईई’च्या विरोधातील याचिका ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात फेटाळली होती. कोरोनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे एक वर्ष बरबाद करता येऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर सरकारने या परीक्षांच्या तयारीला वेग दिला.

नवी दिल्ली: अभियांत्रिकी प्रवेशांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई मेन) आणि वैद्यकीयसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) पुढील महिन्यात घेण्याचा सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याच्या निकालाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी महाराष्ट्रासह बिगर भाजपशासित ६ राज्यांच्या ६ मंत्र्यांनी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. नियोजनानुसार ‘जेईई’ १ ते ६ सप्टेंबरदरम्यान, तर ‘नीट’ परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार आहे.

न्यायालयाने ‘नीट’ व ‘जेईई’च्या विरोधातील याचिका ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात फेटाळली होती. कोरोनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे एक वर्ष बरबाद करता येऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर सरकारने या परीक्षांच्या तयारीला वेग दिला. 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या