Girl Beaten To Death: गाझियाबादमधील मोदीनगर हादरलं, 6 वर्षीय मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळाला

Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका 6 वर्षीय मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. घराबाहेर खेळत असलेल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

Crime News: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका 6 वर्षीय मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. घराबाहेर खेळत असलेल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. तिला विटेने मारहाण करण्यात आली. ही घटना मोदीनगर भागातील गदाना भागात घडली आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

त्याचवेळी, उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर जिल्ह्यात एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला आपल्या मुलाची कथितरित्या हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

बिजनौरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राम आरज यांनी सांगितले की, 'नन्ही आणि तिचा प्रियकर टिंकू सैनी यांनी 16 जानेवारी रोजी 10 वर्षीय वरुणची हत्या केली आणि चांदपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जाफरपूर कोट गावाजवळील उसाच्या शेतात मृतदेह फेकून दिला.' नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Crime News
उत्तर प्रदेश: युवतीचा चार प्रियकरांच्या मदतीने लहान बहिणीवर बलात्कार

मुलाने आईची हत्या केली

दुस-या एका घटनेत एका तरुणाने त्याच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याने आईचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी बागपतमधील बारोट गावात घडली. आरोपी रजत दिल्लीत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एका मुलीच्या संपर्कात आला होता.

बागपतचे पोलिस अधीक्षक (एसपी) नीरज कुमार जदौन यांनी सांगितले की, आरोपी रजत सिंह एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, जे तिच्या पालकांना मान्य नव्हते. रजतने त्याची आई मुनेश देवीसोबत भांडण केले आणि नंतर बेल्टने तिचा गळा दाबून खून केला.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, रजतचे वडील जितेंद्र सिंह मुनेशच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घटनास्थळी पोहोचले. जितेंद्र सिंह यांनी मुनेशला रुग्णालयात (Hospital) नेले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com