भोपाळमध्ये साजरी होतेय 'स्मार्ट मकरसंक्रांत'

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये प्रथमच जिल्हा प्रशासन, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीवरील स्ट्रीट फॉर पीपल्स चॅलेंज अंतर्गत  रोडवर आज (गुरुवारी) पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

भोपाळ:  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये प्रथमच जिल्हा प्रशासन, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीवरील स्ट्रीट फॉर पीपल्स चॅलेंज अंतर्गत  रोडवर आज (गुरुवारी) पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात,  लहान  मोठे पतंग आकाशात उडतांना आपल्याला दिसत आहे. येथे तीळगुळा बरोबरच पारंपारिक खेळही पहायला मिळतील. 

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य सिंह म्हणाले की, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण 8 ते 10 फूट मोठे पतंग असेल. याबरोबरच लोकांना येथे तिळ व गूळचा आनंदही घेता येणार आहे. महिलांना मोफत मेंहदी  काढून मिळण्याची सोय उपलब्ध केली आहे. सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. 

भोपाळ स्मार्ट सिटी नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि करमणुकीसाठी स्ट्रीट फॉर पीपल्स चॅलेंज हा  कार्यक्रम आयोजित करत असल्याची माहिती त्यांनी दिली.  मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग महोत्सवाच्या थीमवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आगार चौकाजवळ श्यामला हिल्समध्ये असलेल्या स्मार्ट रोडवर हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमादरम्यान रंगीबेरंगी पतंग आकाशात उडवले जातील. प्रत्येक वयोगटातील लोक यामध्ये विनामूल्य सहभागी होऊ शकतील. पतंग उडवण्याव्यतिरिक्त झुम्बा, क्रिकेट, बॅडमिंटन, टग ऑफ वॉर, सायकलिंग इत्यादी स्पर्धा सुद्धा होणार आहेत.  

आदित्यसिंग यांनी माहिती दिली की कार्यक्रमस्थळी  तिळ-गूळ आणि ऊसाचे स्टॉल्स असतील, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना मकरसंक्रांतीशी संबंधित पारंपारिक गोड मिठाईचा आनंद घेता येणार आहे. यावेळी पथनाट्यांच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेबद्दल जागरूक केले जाईल. स्वच्छता कार्यक्रमातील सहभागींना प्रमाणपत्रेही वाटली जातील. कार्यक्रमांच्या दरम्यान, सामाजिक अंतरासाठी विशेष काळजी घेतली जाईल. कार्यक्रमात भाग घेणार्‍या सर्व सहभागींना मुखवटे घालणे आवश्यक असेल.

संबंधित बातम्या