'ममता बॅनर्जी नंतर स्मृती इराणींची स्कूटरवारी'

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

भाजपचे दिग्गज नेते पश्चिम बंगालमध्य़े सभा घेत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

पंचपोटा : आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका होत आहेत. तत्पूर्वी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपमध्य़े आरोप प्रत्य़ारोपांच्या फैरी झडत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंधन दरवाढीविरोधात इलेक्ट्रीक स्कूटरवरुन प्रवास करत मोदी सरकारचा निषेध केला होता. भाजपचे दिग्गज नेते पश्चिम बंगालमध्य़े सभा घेत ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

ममता बॅनर्जी नंतर भाजपच्या फायरब्रॅंड नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रोड शो केला. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांसह त्या स्कूटरवरुन येताने दिसल्या. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी हजारा मोरे ते सचिवालय असा प्रवास करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. स्मृती इराणी पंचपोटा मध्ये कार्यकर्त्यांसह रोड शो केला. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परगणामध्ये रोड शो केला होता.

‘शेतकरी संघटनांनी सरकारच्या प्रस्तावाला पहिल्यांदा प्रतिसाद द्यावा’

इराणी यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. स्मृती इराणी यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार,‘’भाजपचे वरिष्ठ नेते पश्चिम बंगालमध्ये सभा घेत आहेत. बंगालचे लोक मोठ्यासंख्येने या सभांमध्ये सामील होत चांगला प्रतिसाद देत आहेत. यावेळेस बंगाल विधानसभा निवडणूकात भाजपची सत्ता येणार अशी चिन्हे दिसत आहेत.’’

त्यापुढे म्हणाल्या, ममता बॅनर्जी यांच्या सत्ता काळात हिंसेचा बोलबाला राहिला आहे. आता बंगालमधील लोकतांत्रिक आवाज तृणमूल कॉंग्रेसला पराजित करेल.

 

संबंधित बातम्या