बांगलादेशात 7.35 कोटी भारतीय बनावट चलनाची तस्करी

बांगलादेशातील कसबा येथील रहिवासी असलेल्या आपीकडून 500 च्या 7.35 कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त केले आहे.
बांगलादेशात 7.35 कोटी भारतीय बनावट चलनाची तस्करी
NIADainik Gomantak

भारतातील आयएसआय समर्थित तस्करांच्या मदतीने पाकिस्तानमध्ये छापलेल्या बनावट भारतीय चलनाची अवैध शिपमेंट रोखण्यासाठी एनआयएने तपास सुरू केला आहे. एनआयए कायदा 2008 अंतर्गत दिलेल्या अधिकारांच्या आधारे या प्रकरणाचा तपास परदेशात जाऊन केला जाईल.

गुवाहाटी शाखा कार्यालयात नियुक्त एनआयएचे निरीक्षक अर्पण साहा यांची या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताची आर्थिक स्थिती अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सची ही योजना असल्याचे मानले जात आहे. गुन्ह्याची तीव्रता आणि त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने गेल्या महिन्यात NIA ला 2008 च्या कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.

NIA
Punjab Election: मुख्यमंत्री चन्नी चमकौर साहिबमधून लढवणार निवडणूक

गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, NIA ने गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी गुन्हा नोंदवला आणि साहा यांना या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले. 26 नोव्हेंबर 2021 रोजी, बांगलादेश पोलिसांनी भारतीय चलन (FICN) तस्कर फातिमा अख्तर आपी आणि तिचा सहकारी SK MD अबू तालेब यांना पकडले आणि त्यांची चौकशी केली आहे. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

हे प्रकरण भारताशी संबंधित असल्याने बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी भारताशी संपर्क साधून माहिती शेअर केली. बांगलादेशी (Bangladesh) अधिकार्‍यांनी भारताला सांगितले की त्यांनी बांगलादेशातील कसबा येथील रहिवासी असलेल्या आपीकडून 500 च्या 7.35 कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त केले आहे. यानंतर आपी आणि तालेबला बांगलादेशच्या पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींकडे चौकशी केल्यानंतर सुलतान आणि साफी या दोन पाकिस्तानी (Pakistan) नागरिकांनी बांगलादेशात बनावट नोटा पाठवल्याचे निष्पन्न झाले.

एनआयएने (National Investigation Agency) एफआयआरमध्ये नमूद केले आहे की, भारताची अर्थव्यवस्था अस्थिर करण्यासाठी पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय तस्करांकडून बनावट नोटा शेजारच्या देशात छापल्या गेल्या होत्या. त्याच वेळी, बांगलादेश पोलिसांनी बांगलादेश विशेष अधिकार कायदा 1974 च्या कलम 2 (s) a (b) अंतर्गत गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता.

एनआयएने सांगितले की बांगलादेश पोलिसांनी सामायिक केलेल्या इनपुटच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com