...म्हणून उरकला धुमधडाक्यात पोलीस स्टेशनमध्येय हळदी समारंभ 

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात हाहाकार मजला आहे. अशा परिस्थितीत लोकांना घरांमध्ये रहाण्यास सांगितले जात आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात हाहाकार मजला आहे. अशा परिस्थितीत लोकांना घरांमध्ये रहाण्यास सांगितले जात आहे, तर दुसरीकडे डॉक्टर आणि पोलिसांना वाढत्या रुग्ण संख्येमुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळत नाहीये. दरम्यान राजस्थानमधून एक बातमी समोर आली आहे. जिथे एका महिला कॉन्स्टेबललांना सुट्टी न मिळाल्याने त्यांनी आपला हळदी समारंभ चक्क पोलीस स्टेशनमधेच उरकला. लवकरच येत्या काळात तिचे लग्न देखील होणार आहे. (So the haldi ceremony was held at the police station)

भारत बायोटेकची लस राज्याला 600 तर केंद्राला 150 रुपयांत

राजस्थानमधील डूंगरपूर येथे तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलचे लग्न ठरले होते. परंतु, त्यानंतर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला. लोकांना कायद्याच्या कक्षेत ठेवणे आवश्यक होते, त्यामुळे हवालदारांला सुट्टी घेणे शक्य नव्हते. लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम ठरला होता, सोहळा कोणत्या दिवशी होईल हे देखील ठरले होते. हळद लावण्याची वेळ आली तरी सुट्टी घेता येत नव्हती. यानंतर हळदी समारंभ पोलिस ठाण्यातच पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिस ठाण्यात हजर असलेल्या इतर महिला पोलिसांनी हळद लावून विधी पूर्ण केला.

दरम्यान, देशात सध्या कोरोनामुळे सर्व सामान्य लोक मरत आहेतच, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना देखील आपला जिव गमवावा लागतोय. अशातच कोरोना प्रादुर्भावामुळे लग्न संभारंभ कमी लोकांच्यात साजरा करा असं सरकारने बंधनं घातलेली आहेत. अशातच या महिला पोलीस कॉन्स्टेबलने कामाच्या प्रति प्रेम दाखवत पोलीस स्टेशनमधेच हळद लावून घेतली. 

संबंधित बातम्या