Bageshwar Dham: '...तर मी तुमच्या पायावर डोकं ठेवेन' - अंनिसच्या श्याममानव यांचे धीरेंद्र शास्त्रींना आव्हान

Bageshwar Dham: एखाद्या खोलीत प्रत्यक्ष न जाता त्या खोलीत काय वस्तू आहेत तेही ते ओळखू शकतात असाही त्यांनी दावा केला आहे. आपल्याला चमत्कार करता येतो असा त्यांनी दावा केला आहे. आता धीरेंद्र शास्त्रींच्या या चमत्काराच्या दाव्याला आव्हान देण्यात आलं आहे.
Bageshwar Dham
Bageshwar DhamDainik Gomantak

Bageshwar Dham: मध्यप्रदेश येथील धर्मेंद्र शास्त्री मागच्या बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहेत. धीरेंद्र शास्त्रीचा हा दावा केला आहे कि त्याच्याकडे दिव्यशक्ती आहे. त्या शक्तीने ते एखाद्या माणसाचे नाव त्याच्या संपूर्ण घराची माहिती जाणून घेऊ शकतात.

त्याचबरोबर एखाद्या खोलीत प्रत्यक्ष न जाता त्या खोलीत काय वस्तू आहेत तेही ते ओळखू शकतात असाही त्यांनी दावा केला आहे. आपल्याला चमत्कार करता येतो असा त्यांनी दावा केला आहे. आता धीरेंद्र शास्त्रींच्या या चमत्काराच्या दाव्याला आव्हान देण्यात आलं आहे. अंनिसचे श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांनी हे नागपुरात येऊन आम्ही सांगेल त्या माणसांसोबत हा चमत्कार करुन दाखवावा.

90 टक्के जरी अचुकता आढळली तर मी हार मानायला तयार आहे.असे श्याममानव यांनी म्हटले आहे. आम्ही हे प्रयोग सलग 5-6 दिवसाच्या अंताराने दोन वेळा करु आणि यात जर धीरेंद्र शास्त्री जर अचुक आढळून आले तर मी स्वत: त्यांच्या पायावर डोके ठेऊन माफी मागेन आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी उभारलेली अंनिसची चळवळ बंद करेन असे श्याममानव यांनी म्हटले आहे.

Bageshwar Dham
Assembly Election 2023: निवडणुकीपूर्वीच काँग्रेस आघाडीला ममतांनी दिला दणका, 'या' राज्यात स्वतंत्र लढणार

दरम्यान, धीरेंद्र शास्त्रींवर आरोप होत असले तर त्यांचे लाखो भक्त असल्याचे दिसून येत आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी श्याममानव यांना मध्यप्रदेशा( Madhya Pradesh )त या तुमचे आव्हान स्विकारतो असे म्हटले आहे. मात्र श्याममानव यांची अटच ही आहे की धीरेंद्र शास्त्री यांनी हा प्रयोग करण्यासाठी नागपुरात यावे. आता धीरेंद्र शास्त्री हा प्रयोग करण्यासाठी नागपुरला येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com