CRPF Volleyball: काश्मिरमध्ये हिमवृष्टीत व्हॉलीबॉल खेळतानाचा जवानांचा व्हिडिओ व्हायरल...

दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फाचा दोन फुटांचा थर
CRPF Volleyball
CRPF VolleyballDainik Gomantak

CRPF Volleyball Video: सध्या संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने ग्रासला आहे. डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खोऱ्याचा उर्वरित देश आणि जगाशी संपर्क तुटला आहे. कडाक्याच्या थंडीत जेव्हा प्रत्येकजण घरात रजईमध्ये लपून उब घेत असताना लष्करातील जवान मात्र पूर्ण निष्ठेने देशसेवेसाठी सीमेवर तत्पर असतात. दरम्यान, सीआरपीएफ जवानांचा व्हॉलीबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

CRPF Volleyball
Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या, कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन...

हा व्हिडिओ दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील आहे. बर्फवृष्टीमध्ये सीआरपीएफ जवान व्हॉलीबॉल खेळाचा आनंद घेत असल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. मैदानात बर्फ साचला असून त्यावर व्हॉलीबॉलची मॅच रंगलेली या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

CRPF Volleyball
Vande Bharat: संक्रातीनिमित्त केंद्राकडून तेलंगणाला भेट, 'या' मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, अनंतनाग, पुलवामा आणि शोपियाँच्या विविध भागात दोन फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. ताज्या बर्फामुळे जवाहर बोगद्याजवळ मोठी निसरडी झाल्याने रस्त्यावर अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे कामही बंद पडले आहे. सकाळी बर्फवृष्टी होऊनही हा रस्ता छोट्या वाहनांसाठी खुला करण्यात आला.

पूंछ आणि राजौरी या दोन जिल्ह्यांना शोपियाँशी जोडणारा मुघल रस्ता, तसेच श्रीनगर-लेह महामार्ग परिसर हिवाळ्यापुर्वीच बंद करण्यात आला होता. काश्मीर खोऱ्यासह आणि जम्मूच्या काही भागात सकाळपासून हिमवर्षाव सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com