'काही लोक मला लोकशाहीचे धडे देण्याचा प्रयत्न करतायत'; पंतप्रधान मोदींकडून विरोधकांना कानपिचक्या

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 27 डिसेंबर 2020

काही लोक मला लोकशाहीचे धडे देत आहेत; पण हेच लोक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही पुद्दुचेरीत निवडणुका घेऊ शकत नाहीत, असा उलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

नवी दिल्ली : काही लोक मला लोकशाहीचे धडे देत आहेत; पण हेच लोक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही पुद्दुचेरीत निवडणुका घेऊ शकत नाहीत, असा उलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्‍मीरसाठी आयुष्यमान भारत योजना लागू करण्याच्या कार्यक्रमात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगदारे बोलताना मोदींनी, जम्मू काश्‍मीरमध्ये नुकत्याच झालेल्या डीडीसी निवडणुकांमध्ये नागरिकांनी कोरोना संसर्ग व थंडीचा प्रकोप असूनही उत्साहाने घेतलेल्या सहभागामुळे या राज्याच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

 पंतप्रधानांनी सांगितले, की आयुष्यमान भारतच्या देशातील पद्धतीप्रमाणेच काश्मिरात राबविली जाईल. यात प्रत्येक नागरिकास सरकारी रुग्णालयातील उपचारांसाठी नागरिकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च मोफत मिळेल. जम्मू काश्‍मीरच्या युवकांसाठी रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध करण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचेही मोदींनी सांगितले.

संबंधित बातम्या