मृत्यूच्या विळख्यात अडकलेल्या आईसाठी मुलानं गायलं गाणं

A song sung by a child for a mother in the throes of death
A song sung by a child for a mother in the throes of death

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही प्रचंड ताण पडत आहे. असं असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या काही ह्रदयस्पर्शी कथा सोशल मिडियाच्या माध्यमातून जगासमोर मांडल्या जात आहेत. कोरोनामुळे मृत्यूच्या विळख्यात आडकलेल्या आईशी बोलण्याची इच्छा एका महिलेच्या मुलाने व्यक्त केल्याची पोस्ट सोशल मिडियावर प्रचंड चर्चेली जात आहे. (A song sung by a child for a mother in the throes of death)

डॉ. दिपशिखा घोष (DipshikhaGhosh) यांनी हा घडलेला प्रकार सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितला आहे. ‘’आज मी माझी शिप्ट संपवत असतानाच रुग्णांवर उपचार सुरु असणाऱ्या मात्र जगण्याची शक्यता कमी असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करत होते. आम्ही सामान्यपणे सगळ्यांना कॉल करतो. जर एकाद्या रुग्णाला त्याच्या घरच्यांशी काही सागांयचं असेल असा कॉल करतो. त्यावेळी एका महिलेच्या मुलाने थोडा वेळ मागितला आणि त्याने मृत्यूच्या दाराशी असणाऱ्या आपल्या आईसाठी एक सुंदर गाणं गायलं,’’ असं घोष यांनी पहिल्या आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये दिपशिखा घोष यांनी, ‘’तो मुलगा, तेरा मुझसे है पहले का नाता कोई गाणं गायला. ती तिथे त्यावेळी फोन धरुन उभी होते. आईसाठी गाणं गाणारा मुलगा आणि त्या महिलेकडे पाहत होते. त्यानंतर नर्स काही वेळाने माझ्याकडे आल्या माझ्या शेजारच्या राहिल्या. गाणं गात असतानाच तो मुलगा रडू लागला परंतु त्याने रडत रडत आईसाठी गाणं पूर्ण केलं. त्याने नंतर आईच्या प्रकृतीची माहिती घेतली, आणि शेवटी त्याने माझे आभार मानले आणि त्याने कॉल बंद केला, असं सांगितलं आहे.

''मी आणि नर्स त्या ठिकाणी उभे होतो. फोन झाल्यानंतर आम्ही दोघींनी एकमेकांकडे पाहिल आणि आमचे डोळे लगेच पाणवले. त्यानंतर नर्स आपल्या नेमूण दिलेल्या बेड्स जवळ गेल्या आणि आपल काम करु लागल्या. या घटनेमुळे माझ्यासाठी या गाण्याचा अर्थ पूर्णरित्या बदलून गेला होता. आता माझ्यासाठी हे गाणं फक्त दोघांचचं झालं होतं ते कायमचचं!'' असं घोष तिसऱ्या ट्विटमध्ये सांगतात.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com