'ही माझी चूक होती' पंजाबच्या निकालावर सोनिया गांधींची प्रतिक्रिया

सोनिया म्हणाल्या, असं असेल तर कोणत्याही त्यागासाठी तयार
sonia gandhi says protecting captain amrinder singh is my mistake punjab election result
sonia gandhi says protecting captain amrinder singh is my mistake punjab election resultDainik Gomantak

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर सोनिया गांधींचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांचा बचाव करणे ही त्यांची चूक असल्याचे सोनिया गांधी म्हणाल्या. अमरिंदर सिंग यांनी निवडणुकीपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि काँग्रेस पक्षही सोडला होता. यानंतर त्यांनी एक नवीन पक्ष (पंजाब लोक काँग्रेस) स्थापन केला आणि 2022 ची पंजाब (Punjab) विधानसभा निवडणूक (Assembly Election) भाजपसोबत युती करून लढवली, यावर पक्ष काही करू शकला नाही. काँग्रेसच्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत रविवारी कॅप्टनला पदावरून आधी हटवावे लागेल, अशी चर्चा होती.

sonia gandhi says protecting captain amrinder singh is my mistake punjab election result
मुलींसोबत अश्लील वर्तन, व्हिडिओ व्हायरल

यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, मी कॅप्टन साहेबांना वाचवत राहिले, ही माझी चूक होती. अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला, पाच राज्यांतील काँग्रेसच्या पराभवाला केवळ गांधी घराणेच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. अमरिंदर सिंग म्हणाले की, काँग्रेसने तात्पुरते सिद्धू आणि भ्रष्ट चन्नीच्या पाठिंब्याने स्वतःची कबर खोदली. गांधी कुटुंबाला जबाबदार धरून अमरिंदर सिंग म्हणाले की, काँग्रेस केवळ पंजाबमध्येच नाही तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही हरली आहे. गांधी घराण्याच्या नेतृत्वावरचा लोकांचा विश्वास उडाला असल्याने हे घडल्याचे ते म्हणाले.

सोनिया म्हणाल्या होत्या - कोणत्याही प्रकारच्या त्यागासाठी तयार आहोत, निवडणूक (Election) निकालानंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक झाली. त्यात सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, गांधी घराण्यामुळे पक्ष कमकुवत होत असल्याचे काही लोकांना वाटत आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार आहोत.

sonia gandhi says protecting captain amrinder singh is my mistake punjab election result
असं 'काय' घडलं ज्यामुळं या महिलेनं केलं हे कृत्य

चरणजितसिंग चन्नींचा पक्षावर घणाघात

सोनिया म्हणाल्या होत्या की, काँग्रेसला मजबूत करणे हे त्यांचे पहिले उद्दिष्ट आहे. त्यासाठी कोणताही त्याग करावा लागतो. आता काँग्रेस एप्रिलमध्ये चिंतन बैठक आयोजित करणार आहे. तोपर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा राहतील. मात्र, काँग्रेस पक्षाने सोनिया गांधींना पाठिंबा दिला आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते की, या सर्वांनीच सोनिया गांधींना 5 राज्यांमध्ये पक्षाच्या पराभवासाठी त्या एकट्या जबाबदार नसल्याचे सांगितले आहे. राज्यांचे नेते आणि खासदार यांची संपूर्ण जबाबदारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com